
बेळगाव : महाराष्ट्रातील कोकण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील 8 पूल पाण्याखाली गेले आहेत. चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व तिच्या उपनद्या वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 4 फुटांनी वाढ झाली आहे. राजापूर बॅरेजमधून 41167 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदलगा येथील दूधगंगा नदीत 16245 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढत आहे.
याशिवाय चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील येडूर-कल्लोळ, मलिकवाड-दत्तवाड, कारदगा-भोज, भोजवडी कुन्नूर, सिदनाळ-अकोला, जत्राट-भिवशी, ममदापूर-हुन्नरगी, कुन्नूर-बारवाड हे चिक्कोडी व निपाणी तालुक्यातील सखल भागातील 8 पूल जलमय झाले आहेत. येडूर, कल्लोळ, चंदूर, इंगळी, मांजरी या नदीकाठच्या गावांना पुराचा धोका आहे. संभाव्य पुराची खबरदारी म्हणून तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावात मदतकार्याची सर्व तयारी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta