अंकली (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या संस्थांनी समाजातील प्रत्येक नागरिकांना अर्थसाह्य पुरवठा करून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास सहकारी संस्था बळकट होऊ शकतात. स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केल्यामुळे आज जगाच्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोरले गेले आहे. आज त्यांच्या नावानेच स्थापन झालेली ही मांजरीची संस्था समाजातील प्रत्येक घटकाला कामधेनू म्हणून कार्यरत राहू दे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सदस्य व माजी मुख्य पक्ष प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी केले.
मांजरी ता. चिकोडी येथे छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभात उद्घाटक या नात्याने महांतेश कवटगीमठ बोलत होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सदलगाचे माजी आमदार कल्लाप्पण्णा मगेन्नवर, संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब यादव, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव, शिवाजी क्रेडिट सवार संस्थेचे संचालक मोहन लोकरे हे उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र भोसले हे होते.
प्रारंभी उपस्थितांच्या स्वागत संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब यादव यांनी केले. संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माजी विधानपरिषदेचे सदस्य महांतेश कवटगीमठ व माजी आमदार कल्लाप्पण्णा मगेन्नवर यांच्या हस्ते करण्यात आले. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण ग्रामीण भागात सहकारी संस्था चालवणे हे खूप कष्टाचे बनले आहे. संस्थेतून घेतलेले कर्ज सभासदांनी वेळेत परतफेड केले तरच सभासदाचे कार्य महत्त्वाचे ठरते. आज ग्रामीण भागातही अनेक राष्ट्रीयीकृत बँका पदार्पण करत आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्राला मारक ठरणार आहेत. यासाठी सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक आणि प्रामाणिकपणा व पक्षविरहित कार्य करावे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सहकारी संस्थेच्या योजना पुरवून त्यांचे आर्थिक स्तर उंचावण्याबरोबरच संस्थेच्या प्रगतीसाठी परिश्रम करावे, असे महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार कल्लाप्पण्णा मगेन्नवर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संपूर्ण राज्यात विशेष करून बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील सर्वच सहकारी संस्था प्रगतिपथावर आहेत. आज सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक संचालक मंडळ व संस्थेचे कर्मचारी प्रामाणिकपणे परिश्रम घेत आहेत. त्यामुळेच संपूर्ण राज्यात बेळगाव जिल्हा सहकार क्षेत्रातील केंद्रबिंदू बनला आहे, असे ते म्हणाले.
या उद्घाटन समारंभास संस्थेचे उपाध्यक्ष अशोक कळविरे, संचालक बाळासाहेब काडापुरे, विठ्ठल टोणपे, बब्रुवाहन सारापुरे, ज्ञानेश्वर पाटोळे, शिवाजी रोडे, विश्वास रसाळे, जहांगीर कोथळी, परशुराम तोरशे यांच्यासह अन्य संचालक मंडळ व छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या इंगळे शाखा व उगार शाखेचे सल्लागार संचालक मंडळ उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे प्रधान व्यवस्थापक सुखदेव पाटोळे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta