Monday , December 8 2025
Breaking News

मदत करण्याच्या बहाण्याने बनावट एटीएम देऊन खात्यावरील रक्कम काढणाऱ्या भामट्याला अटक

Spread the love

 

चिक्कोडी पोलिसांची कारवाई

अंकली (प्रतिनिधी) :  एटीएममधून रक्कम काढणाऱ्या ग्राहकांना मदत करण्याच्या निमित्ताने त्यांना फसवून त्यांचे एटीएम घेऊन दुसरे एटीएम देऊन त्यांच्या खात्यावरील रक्कम काढून फसवणाऱ्या एका भामट्याला चिक्कोडी पाेलिसांनी अटक करण्यात आली असून सदर भामटा हा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील रहिवासी असून अमोल दिलीप सकटे (वय 30) असे त्याचे नाव असून त्याला चिकोडी पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चिकोडी पोलीस स्थानकातून समजलेली माहिती अशी की, हालटी तालुका चिकोडी येथील रहिवाशी विजया दाणापा ढाले ही चिकोडी येथील एटीएममधून रक्कम काढण्यास आली असता सदर महिलेला फसवून भामट्याने त्यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांना दुसरे बनावट एटीएम देऊन त्यांच्या खात्यावरील सुमारे 37 हजार 500 रुपये काढून त्यांना फसवल्याचा गुन्हा चिकोडी पोलीस स्थानकात गेल्या सप्टेंबर महिन्यात 3 तारखेला दाखल करण्यात आला होता. सदर घटनेबद्दल चिकोडी पोलिसांनी चिकोडी उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज एल्गार, सीपीआय आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक रचून चौकशी केली असता भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. भामट्याकडे बनावट एक्कावन्न एटीएम कार्ड मिळाले असून भामट्याने निपाणी, चिकोडी, रायबाग, अथणी, गोकाक, बेळगाव, विजापूर, बागलकोट व महाराष्ट्रात फसवल्याचे प्रकरण उघडकीस आले असून सदर आरोपीला चिकोडी पोलिसांनी अटक करून पुढील तपास सुरू ठेवला आहे. याप्रकरणी चिकोडी पोलीस स्थानकाचे फौजदार यमनाप्पा मांग, कर्मचारी आर. एल. शिळांनवर, एम. पी. सत्तेगेरी, एस. पी. गलगली यांनी भामट्याला पकडण्यासाठी सहकार्य केले. भामट्याला अटक केल्याबद्दल बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांनी चिकोडी पोलिसांचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

नवहिंद सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी सायनेकर तर व्हा. चेअरमनपदी अनिल हुंदरे यांची निवड

Spread the love  येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *