चिक्कोडी आरडी कॉलेजमधील प्रकार
चिक्कोडी : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा अतिथी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याची घटना चिक्कोडी येथील आरडी कॉलेजमध्ये घडली असून या प्रकरणी अतिथी प्राध्यापकाला विद्यार्थिनीच्या पालकांनी मारहाण केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिक्कोडी शहरातील आरडी कॉलेजमध्ये अतिथी प्राध्यापक कार्यरत असलेल्या राहुल ओतारे याने विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला असल्याची माहिती मिळताच पालकांनी आज कॉलेजमध्ये येऊन सदर प्राध्यापकाला बेदम मारहाण केली.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्राध्यापकाला अटक केली आहे. या अनुचित वर्तनामुळे शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाने त्या प्राध्यापकाला सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती आहे.
Belgaum Varta Belgaum Varta