Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

धबधब्याजवळ अधिकाऱ्यांची ओली पार्टी : उर्वरित चार कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

  बेळगाव : बटावडे धबधब्याजवळील जंगल परिसरात दारूबंदीचे उल्लंघन करून मौजमजा केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य चौघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यटनास बंदी असतानाही बटावडे धबधब्याजवळील वनपरिक्षेत्रात अधिकारी व डॉक्टरांच्या गटाने ओली पार्टी केल्याप्रकरणी जांबोटी वनपरिक्षेत्रात चार जणांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात …

Read More »

पर्यटनास निर्बंध असताना अधिकाऱ्यांनीच केली धबधब्याजवळ ओली पार्टी!

  बेळगाव : अतिवृष्टीमुळे धबधब्याजवळ जाण्यास पर्यटकांना निर्बंध घालण्यात आले असताना अधिकाऱ्यांनीच ओली पार्टी केल्याची घटना जांबोटीजवळच्या बटावडे धबधब्यावर घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, हेस्कॉमचे कांही अधिकारी आणि डॉक्टरांच्या एका गटाने जांबोटीजवळील बटावडे धबधब्याजवळ तंबू ठोकून मोठ्या प्रमाणात पार्टी करून मौजमजा केल्याची घटना सर्वत्र चर्चेत आहे. पावसामुळे धबधबा आणि …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह 19 नेत्यांना हायकमांडकडून बोलाओ

  बंगळुरू : काँग्रेस आमदारांमधील असंतोषाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने हस्तक्षेप केला आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश जारी केला आहे. हायकमांडने काँग्रेसच्या १९ नेत्यांना दिल्लीत येण्याची सूचना केली असून या पार्श्वभूमीवर सतीश जारकीहोळी, रामलिंगरेड्डी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, …

Read More »