Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावात नाताळ सण उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : संपूर्ण जगभरात भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस 25 डिसेंबर हा नाताळ अर्थात ख्रिसमस म्हणून मोठ्या भव्य दिव्य आणि उत्साहात साजरा केला जात असतो. आज नाताळ सणाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरातील ख्रिस्ती बांधवांच्या चर्च प्रार्थना स्थळांमध्ये मध्यरात्री विशेष प्रार्थना सभा संपन्न झाल्या. बेळगाव शहर उपनगरात असलेल्या चर्चमध्ये झालेल्या मध्यरात्रीच्या प्रार्थनेला ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
मध्यरात्री भगवान येशुंचा जन्मदिवस सामुदायिक प्रार्थनेसह साजरा करण्यात येतो. फातिमा कॅथरल चर्च, सेंट मेरी चर्च, तसेच शहापूर येथील चर्चमध्ये मध्यरात्री विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आले होत्या.

बेळगाव येथील कॅम्प परिसरात ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठी असल्याने संपूर्ण कॅम्प परिसर विद्युत दिव्यांच्या रोषणाईने झगमगून गेला. ख्रिश्चन बांधवांचा नाताळ हा प्रमुख सण आहे. नाताळ सणाला चर्च आणि निवासस्थाने सजवण्याची परंपरा आहे. तसेच ख्रिसमस ट्री आणून त्याला स्टार्स फुगे बेल्स इत्यादी वस्तूंनी सजविले जात असतात. याचाच प्रत्येक आज ख्रिस्ती बांधवांच्या घरांमधून तसेच चर्च मध्ये नाताळ निमित्त भगवान येशूंच्या जन्माचे देखावे ही सादर करण्यात आले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *