नगरपालिकेने घेण्यात येत आहे विशेष खबरदारी
गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : गडहिंग्लजमध्ये कोरोनाची लाट ओसरत असताना आता डेंग्यूने शिरकाव केलेला आहे. गडहिंग्लजमध्ये डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत.
नगरपालिकेने विशेष खबरदारी घेऊन धूर फवारणी, औषध फवारणी यासारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागातील तरुण मंडळे घरोघरी जाऊन डेंग्यूपासून दूर राहण्यासाठीची खबरदारी घ्यायला सांगत आहेत.
गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी गेले 2-3 दिवस त्यांच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये युवक वर्गाबरोबर घरोघरी जाऊन डेंग्यू विषयी माहिती देऊन लोकांना तो कसा नष्ट करायचा किंवा होऊ द्यायचा नाही त्याची माहिती सांगत मार्गदर्शन करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी आज या प्रभागातील धुर व औषध फवारणी देखील स्वतः उपस्थित राहून करून घेतली.