Sunday , September 20 2026
Breaking News

गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर चंदगड पोलिसांची कारवाई; एकाला अटक…

Spread the love

कारवाईत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर झांबरे येथे सापळा रचून चंदगड पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून एकूण एकूण ५ लाख ९५ हजार १६०/- रुपये किंमतीचा प्रोव्ही गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सतिश उर्फ चिमाजी भिमराव आर्दाळकर (वय.३३, अडकुर, ता. चंदगड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.२४ जून २०२१ रोजी) पहाटे पावणे तिच्या सुमारास चंदगड पोलीसात अंमलदार पो.शि. सोनुले यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, अडकुर (ता. चंदगड) गावातील सतिश उर्फ चिमाजी आर्दाळकर हा तळकट (सिंधुदुर्ग) मार्गे झांबरे (ता.चंदगड) गावातून अडकुर येथे गोवा बनावटीच्या दारूची चोरून वाहतूक करणार आहे. त्याप्रमाणे पोहवा. नांगरे, पोशि सोनुले व पोशि अष्टेकर यांना सदर ठिकाणी जाऊन कारवाई करणे बाबत आदेश केले होते. त्याप्रमाणे वरील स्टाफ रवाना होऊन मिळाले बातमीचे ठिकाणी सापळा रचून पाहणी करत असताना सहाच्या सुमारास झांबरे (ता.चंदगड) गावातील रवळनाथ मंदिराचे बाजूस असणारे रोडने चंदगडकडे चारचाकी (सुमो गाडी नं MH-12-AN-8621) ही येताना दिसली. त्यास थांबवून सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स मिळून आले.

About Belgaum Varta

Check Also

साहित्यरत्न, विचारवंत कॉमेड अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ ने साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव कोल्हापूरात सन्मानित

Spread the love  कोल्हापूर : ठाणे शहरातील नव्या दमाचे नव्या उमेदीचे समाजातील विविध स्तरांतील विषयावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *