बेळगाव : येथील चंदगड मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी बेळगाव येथे झालेल्या बैठकीमध्ये प्रा. एम. के. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज टिळकवाडी येथे 29 वर्षे सेवा करून अनेक शिक्षक घडवण्याचे कार्य सरांनी केले व आचार, विचार, संस्कार भनेक विद्यार्थ्यांच्यामध्ये जोपासण्याचा मान सराना जातो असे उद्गार डी. बी. पाटील यांनी बोलताना काढले.
संघटनेचे उपाध्यक्ष अशोक थोरात, गंगाराम कंग्राळकर, पी. सी. पाटील, अशोक पाटील यांच्याहस्ते श्रीफळ, पुष्पगुच्छ व फळे देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. एम. के. पाटील चंदगड को.ऑप- सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत. यावेळी अनेक मान्यवराकडून त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
सत्काराला उत्तर देताना संघटनेने केलेला सत्कार आपण स्विकारून आपल्या विश्वासाला पात्र राहून पूढील निवृत्तीनंतर संघटना व सोसायटीत वेळदेऊन प्रगतीसाठी नक्कीच प्रयत्न करण्याची हमी सरांनी व्यक्त केली.
या प्रसंगी अशोक थोरात, डी. बी. पाटील, पी. सी. पाटील, गंगाराम कंग्राळकर, मारुती गावडे, सुनील पवार, सुदेश राजगोळकर, मरगुती पाटील, सेक्रेटरी छाया पाटील, उमाकांत शिरगावकर, सौरभ टोपले सर्व संचालक, सल्लागार व कर्मचारी उपस्थित होते.