Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

भीमा कोरेगाव लढाईत संभाजी राजांच्या हत्येचा बदला घेतला

  प्रमोद हर्षवर्धन : कोगनोळी येथे शौर्य दिन उत्साहात संपन्न कोगनोळी : 1 जानेवारी  1818 रोजी भीमा नदीकाठी भीमा कोरेगाव लढाई झाली. लढाई 500 शूरवीर विरुद्ध 28 हजार पेशवे यांच्यात झाली असून 500 शूरवीरांनी 28 हजार पेशव्यांचा पराभव करून छत्रपती संभाजी महाराजांची मनुस्मृती कायद्याने केलेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही लढाई …

Read More »

बैलहोंगलजवळ भीषण अपघात : दोघांचा मृत्यू

  बेळगाव : सोमवारी रात्री बैलहोंगल-इंचळ रस्त्यावर झालेल्या दुचाकीस्वारांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. मृत व जखमी हे मुतवाड व व्हन्नूर येथील ग्रामस्थ असल्याची माहिती आहे. मात्र अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस सूत्रांनी सांगितले की, प्रत्येकी दोन दुचाकींवर तीन जण स्वार होते. पोलीस …

Read More »

कळसा- भांडुरा प्रकल्पासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात येणार

  खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय खानापूर : कळसा- भांडुरा प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर म. ए. समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला कळसा- भांडुरा प्रकल्पाचे गाढे अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर हे उपस्थित होते. प्रा. केरकर यांनी म्हादई प्रकल्पाची माहिती समिती …

Read More »

ज्ञानयोगाश्रमाचे सिद्धेश्वर स्वामीजी यांचे निधन

  विजयपुर : दुसरे विवेकानंद, चालणारे देव म्हणून ओळखले जाणारे विजयपुर जिल्ह्यातील ज्ञानयोगाश्रमाचे सिद्धेश्वर स्वामीजी (वय 81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारपासून त्यांची प्रकृती खालावली होती. श्‍वसन आणि नाडीत चढ-उतार होत होते. सिद्धेश्वर स्वामीजींचा जन्म २४ ऑक्टोबर १९४१ रोजी विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील …

Read More »

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हेलिपॅडजवळ जिवंत बॉम्ब

  चंदीगड : चंदीगडमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हेलिपॅडजवळ जिवंत बॉम्ब सापडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी (दि. २) घडलेल्या या घटनेने पोलिसांनी आजूबाजूचा सर्व परिसर सील केला. बॉम्ब सापडलेल्या ठिकाणापासून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घर आणि हेलिपॅडजवळ आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे घरही याच परिसरात आहे. कंसल …

Read More »

शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला रिंगरोड रद्द करावा

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : बेळगाव तालुक्यात होणाऱ्या रिंगरोडला शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून आपला विरोध दर्शविला आहे. सरकारने हा रिंगरोड रद्द करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शहरातील वाहनाची कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोड व्यतिरिक्त फ्लाय ओव्हर करून ही समस्या संपवता येते, वाढत्या वाहनकोंडीमुळे अनेक …

Read More »

कर्नाटक सरकार कौरवांचा वारसा चालवत आहेत का?

  ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस खानापूर : अन्यायाने कर्नाटकात डांबलेला सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट होत नाही तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अधुरेच राहील. महाभारतात कौरवांनी पांडवांना एक इंचही जमीन न देण्याची भाषा केली होती. आता कर्नाटक देखील तीच भाषा वापरतो. कर्नाटक सरकार कौरवांचा वारसा चालवत आहेत का? असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक …

Read More »

निपाणीत गुरुवारी महाआरोग्य शिबिर

अमर बागेवाडी : डॉ. प्रभाकर कोरे यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : बेळगाव के. एल. ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या  अमृत महोत्सवानिमित्त गुरुवारी (ता.५) सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत केएलई संस्थेच्या येथील जी.आय. बागेवाडी महाविद्यालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  के. एल. ई. विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू …

Read More »

कॉ. कृष्णा मेणसे यांना यंदाचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार

  आजरा : गेली 80 वर्षांहून अधिक काळ श्रमिक, कष्टकरी, कामगार शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आणि बिदर-भालकी, बेळगांव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आपले आयुष्य वेचणारे कॉ. कृष्णा मेणसे यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना.गव्हाणकर स्मृती पुरस्कार देण्याचा निर्णय आज येथे झालेल्या पुरस्कार व स्मारक समितीच्या बैठकीत …

Read More »

शिवगर्जना महानाट्य खानापूर तालुक्यातील जनतेसाठी पर्वणीच

  खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप व तालुका भाजपच्या वतीने येत्या दि. ७ ते १० जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व लैला शुगर्सचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवगर्जना हा महानाट्य प्रयोग होणार आहे. यानिमित्ताने सोमवारी दि. २ जानेवारी रोजी सकाळी येथील …

Read More »