खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप व तालुका भाजपच्या वतीने येत्या दि. ७ ते १० जानेवारी रोजी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व लैला शुगर्सचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवगर्जना हा महानाट्य प्रयोग होणार आहे.
यानिमित्ताने सोमवारी दि. २ जानेवारी रोजी सकाळी येथील शांतिनिकेतन स्कूलमध्ये शिवगर्जना कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी भाजप नेते विठ्ठल हलगेकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कर्नाटक राज्याचे रयत संघटना राज्यध्यक्ष इराण्णा कडाडी, जिल्हा रयत संघटना अध्यक्ष सुधीर कुलकर्णी, प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, तालुका रयत संघटना अध्यक्ष प्रकाश तिरवीर, मिडीया प्रमुख राजेंद्र रायका, चांगापा निलजकर, यलापा तिरवीर, स्वप्नील यादव आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत लैला सुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांनी केले.
उपस्थितांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना विठ्ठल हलगेकर म्हणाले की, खानापूर तालुक्यातील जनतेला शिवाजी महाराजाचा इतिहास समजावा १२व्या शतकातील इतिहास तसेच शिवाजी महाराजाचा राजाभिषेक याची माहिती व्हावी. हा उद्देश असुन केवळ वाढ दिवसाचे निमित्ताने हा शिवगर्जना महानाट्य प्रयोग मोफत पाहण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. पहिले दिवशी मोफत प्रवास व जेवन देण्यात येणार आहे, अशी माहितीसाठी दिली.
यावेळी उपस्थितांनी विचार मांडले आभार प्रकाश तिरवीर यांनी मानले.