विजयपुर : दुसरे विवेकानंद, चालणारे देव म्हणून ओळखले जाणारे विजयपुर जिल्ह्यातील ज्ञानयोगाश्रमाचे सिद्धेश्वर स्वामीजी (वय 81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारपासून त्यांची प्रकृती खालावली होती. श्वसन आणि नाडीत चढ-उतार होत होते.
सिद्धेश्वर स्वामीजींचा जन्म २४ ऑक्टोबर १९४१ रोजी विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील बिज्जरगी गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. सिद्धगोंडप्पा हे त्यांचे बालपणीचे नाव होते. त्यांच्या अत्यंत साधे राहणी आणि विद्वान प्रवचनामुळे लाखो लोक त्यांना चालणारा देव म्हणायचे. ते जीवनावर अतिशय साधेपणाने व्याख्यान करायचे. गेल्या काही दिवसांपासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते.