Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर समितीकडून शिरोली येथे 27 जूनच्या मोर्चाची जनजागृती

खानापूर : मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमधून मिळावीत सरकारी कारभाराची माहिती मराठीमधून उपलब्ध व्हावी यासाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा निघणार आहे. या मोर्चाची जनजागृती खानापूर तालुक्यामध्ये करत असताना शिरोली या गावी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पत्रके वाटून शिरोली गावातील नागरिकांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन …

Read More »

फरारी कुख्यात गुंडावर बेळगाव पोलिसांचा गोळीबार

बेळगाव : बेळगाव येथील फरारी गुंडावर पोलिसांनी गोळीबार करून त्याला जखमी केले आहे. भवानीनगर येथे झालेल्या बिल्डर राजू दोड्डभोम्मनावर याच्या खून प्रकरणी फरारी असलेला गुंड विशाल सिंग चव्हाण याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात त्याच्या पायावर गोळी लागली असून तो जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळी धर्मनाथ …

Read More »

शिवसेना फुटण्याची शक्यता? मंत्री एकनाथ शिंदे समर्थक 13 आमदार नॉटरिचेबल

मुंबई : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस बाहेर येत असल्याचे वृत्त आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार …

Read More »

एकनाथ खडसे- सचिन आहिर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि सचिन आहिर यांचा विधान परिषद निवडणूकीत विजय झाला. पहिल्या फेरीनंतर एकनाथ खडसे यांना 29 तर सचिन आहिर यांना 26 मते मिळाली. विधान परिषदेत विजयी झाल्यानंतर एकनाथ खडसे आणि सचिन आहिर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणेही तशीच आहेत… म्हणून सचिन आहिर यांना …

Read More »

भाजपचे प्रसाद लाड, काँग्रेसचे भाई जगताप विजयी.. भाजपचा महाविकास आघाडीला पुन्हा कात्रजचा घाट

मुंबई : अत्यंत चुरशीने रंगलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला कात्रजचा घाट दाखवला आहे. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड या निवडणुकीमध्ये विजयी झाले. तर काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले असून चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची तीन मतं फुटली असून त्यांना पहिल्या पसंतीची केवळ 41 …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची उद्यापासून विभागवार जनजागृती

27 जूनचा मोर्चा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती (दिगंबर पाटील गट) बैठक आज 20 जून रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबरराव पाटील हे होते. प्रास्ताविक समितीचे ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी केले. यावेळी बैठकीचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र …

Read More »

हुक्केरी पोलिसांकडून ५७ हजार मुद्देमालसह चोर गजाआड

संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरी गावात घरफोडीच्या सलग घटना घडू लागल्याने नागरिकांनी पोलिसांविरोध आवाज उठविला होता. हुक्केरी पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत घरफोडीच्या चौथ्या दिवसी चोराला गजाआड करुन चोराकडून ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हुक्केरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महंमदरफीक तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून घरफोडी प्रकरणातील चोराला …

Read More »

४० वर्षात झाले नाही, ते ‘डबल इंजिन’ सरकारने ४० महिन्यात केले

मोदींचा विरोधकाना टोला, ३३ हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचा कोनशीला कार्यक्रम बंगळूर : बंगळुरमधील उपनगरीय रेल्वे प्रकल्पाची गेल्या ४० वर्षांपासून चर्चा सुरू आहे. पण आम्ही तसे नाही, आम्ही ४० महिन्यांत कार्यक्रम पूर्ण केले. शहरातील रेल्वे प्रकल्प काही महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. शहरातील कोम्मघट्टा येथे …

Read More »

विराट मोर्चाने मराठी माणसाची शक्ती दाखवून देण्याचा तालुका समितीच्या बैठकीत निर्धार

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीमुळेच सीमाभागात मराठी भाषा टिकून आहे. आता आपले हक्क डावलणार्‍या कर्नाटकी प्रशासन आणि सरकारला जाब विचारण्याची वेळ आली. 27 जूनच्या विराट मोर्चाची जनजागृती झाली असली तरी, प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावात मोर्चाची जागृती करावी आणि विराट मोर्चात मराठी माणसांची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

तिवोली येथे घुमला “एक सीमावासी लाख सीमावासीचा” नारा

खानापूर : मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमधून मिळावीत यासाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या महामोर्चाची जनजागृती करण्यासाठी खानापूर तालुक्यातील तिवोली या गावी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पत्रके वाटण्यात आली. यावेळी गावचे ज्येष्ठ नागरिक व सीमा सत्याग्रही गोपाळ हेब्बाळकर गुरुजी यांनी सीमावासीयांवर होणाऱ्या अत्याचाराचा पाढा वाचून या मोर्चामध्ये तिओली गावातील …

Read More »