Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

सौंदलगा येथील सरकारी जमिनीतील अनाधिकृत घर जमीनदोस्त

सौंदलगा : येथील सरकारी जमिनीतील अनाधिकृत घर पाडले. सर्वे नंबर ३८६/१ ही सरकारी गायरान ५ एकर २३ गुंठे आहे. त्या जागेवर नारायण गणपती माने यांनी अनधिकृत घर बांधले होते. या संदर्भात तलाठी एस. एम. पोळ, ग्राम सहाय्यक नंदकुमार पाटील यांनी वेळोवेळी नारायण गणपती माने यांना तोंडी समज दिली होती. मात्र …

Read More »

प्रेरणा महिला मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीचा द्विदशकपूर्ति उत्साहात

बेळगाव : हिंडलगा येथील प्रेरणा महिला मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीला 20 वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने द्विदशकपूर्ति कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ईशस्तवन आणि स्वागतगिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच्या चेअरमन प्रा.सौ. शशिकला ल. पावशे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले. सौ. टि. एन. पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा …

Read More »

विधानपरिषद मतमोजणीला झाली सुरुवात

बेळगाव : वायव्य कर्नाटक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला बुधवारी सकाळी बेळगाव येथील ज्योती पीयुसी कॉलेजमध्ये सुरुवात झाली आहे. प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास, निवडणूक निरिक्षक मन्नीवन्नन, बेळगाव चे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह विजापूर बागलकोटचे डी सी, पोलिंग एजंट यांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात आला आणि मतमोजणीला …

Read More »

भारताचं मालिकेतील आव्हान जिवंत; तिसरा सामना 48 धावांनी जिंकला

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने आधी दमदार फलंदाजीचं आणि नंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवत सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारताकडे अजूनही मालिका जिंकण्याचे चान्सेस आहेत. विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए मैदानात आजचा सामन पार पडला. भारताने 180 …

Read More »

परिवहन मंत्री अनिल परब ईडीचं समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहेत. सकाळी 10 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. दापोली साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब गेल्या …

Read More »

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी घेतली शरद पवारांची भेट

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विरोधी पक्षांकडून सर्वसहमीने उमेदवार निवडीवर चर्चा सुरु आहे. यामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेत मंगळवारी (दि. १४) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रपती निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ममता बॅनर्जी …

Read More »

संकेश्वरात मृगाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली..

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर परिसरातील शेतकरी आकाशाकडे डोळा लावून बसलेले दिसताहेत. खरीपाची पेरणी तब्बल पंधरा-वीस दिवस लांबल्याने शेतकरी काळजीत पडलेले दिसत आहेत. संकेश्वर भागातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्वी मशागतीची कामे आटोपून पेरणीची तयारी केलेली दिसत आहे. पेरणीसाठी लागणारी बि-बियाने खरेदी करुन पेरणीसाठी बैलांची, शेतमजुरांची जमवाजमव केली जात आहे. पाऊस बरसताच …

Read More »

संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार आहे. पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत या तारखांची शिफारस केली गेली आहे, अशी माहिती सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आगामी पावसाळी अधिवेशन 17 दिवस होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनादरम्यान …

Read More »

लोकसभा पोटनिवडणुकीत सरकारी पैशाचा दुरुपयोग

अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची भीमाप्पा गडाद यांची मागणी बेळगाव : लोकसभा पोटनिवडणुकीत सरकारी पैशाचा दुरुपयोग केलेल्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केली आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांना जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशात भीमाप्पा गडाद यांनी म्हटले आहे की, बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीवेळी सरकारकडून मंजूर झालेला निधी …

Read More »

संकेश्वरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज सुवासिनी स्त्रियांनी वटपौर्णिमा उत्साही वातावरणात साजरी केली. वडाचे वृक्ष असलेल्या ठिकाणी सुवासिनी स्त्रियांनी पूजेसाठी एकच गर्दी केलेली पहावयास मिळाली. सुवासिनी महिलांनी सौभाग्यवृध्दीसाठी वडाच्या मुळांना पाणी अर्पण करुन वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करीत पूजाअर्चा करतानाचे चित्र पहावयास मिळाले. वटपौर्णिमा भक्तीभावाने साजरी करतांना सुवासिनी …

Read More »