Sunday , July 26 2026
Breaking News

सौंदलगा येथील सरकारी जमिनीतील अनाधिकृत घर जमीनदोस्त

Spread the love

सौंदलगा : येथील सरकारी जमिनीतील अनाधिकृत घर पाडले. सर्वे नंबर ३८६/१ ही सरकारी गायरान ५ एकर २३ गुंठे आहे. त्या जागेवर नारायण गणपती माने यांनी अनधिकृत घर बांधले होते. या संदर्भात तलाठी एस. एम. पोळ, ग्राम सहाय्यक नंदकुमार पाटील यांनी वेळोवेळी नारायण गणपती माने यांना तोंडी समज दिली होती. मात्र याकडे माने यांनी दुर्लक्ष करून सरकारी गायरानात घर बांधले. हे महसूल खात्याला कळवून अनाधिकृत घर जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. यावेळी महसूल खात्यामधील महसूल सर्कल इंस्पेक्टर ए. जी. वंजोळे सर्कल मधील सर्व तलाठी उपस्थित होते. यावेळी तलाठी एस. एम. पोळ यांनी सांगितले की ३८६/१ सर्वे नंबर हा सरकारी गायरान म्हणून नोंद आहे. या सर्वे नंबर मध्ये नारायण गणपती माने यांना आपण व ग्राम सहायक नंदकुमार पाटील दोघांनी वेळोवेळी घर बांधण्यास मज्जाव केला होता. मात्र सुट्टीच्या कालावधीत त्याने घर बांधल्याने ते सरकारी नियमानुसार पाडले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *