Sunday , April 19 2026
Breaking News

प्रेरणा महिला मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीचा द्विदशकपूर्ति उत्साहात

Spread the love

बेळगाव : हिंडलगा येथील प्रेरणा महिला मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीला 20 वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने द्विदशकपूर्ति कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ईशस्तवन आणि स्वागतगिताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच्या चेअरमन प्रा.सौ. शशिकला ल. पावशे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण केले. सौ. टि. एन. पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सल्लागार माजी महापौर मालोजी अष्टेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी संघ हुबळीचे जॉईंट रजिस्ट्रार श्री. कल्लाप्पा ओब्बणगोळ आणि सौ. सुरेखा डी. मिसाळे उपस्थित होते. सौ. रोहिणी कुलकर्णी यांच्या अतिथी परिचयानंतर सौ व श्री. लक्ष्मण फ. पावशे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. कारगील युद्धातील शहीद जवान कल्लाप्पा खादरवाडकर यांच्या स्मरणार्थ बेकिनकेरे येथे किमान उभी करणारया श्रीमती रेखा खादरवाडकर यांचा सन्मान श्रीमती सुलन बी. अनगोळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी श्री. ओब्बणगोळ यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन संस्थेबद्दल प्रशंसोदगार काढले. सौ. सुरेखा मिसाळे व मालोजी अष्टेकर यांनीही संस्थेच्या प्रगतीसाठी चेअरमन प्रा.सौ. शशिकला ल. पावशे व संचालक मंडळ यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना बक्षीसे वाटण्यातआली. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. सुरेखा मिसाळे यांनी अस्सल ग्रामीण ढंगातील कथा सांगितली. सौ. वीणा वि. हुंदरे यांनी अफझलखानाच्या वधाचा पोवाडा म्हटला. सौ. रुपा कुप्पेकर यांनी गवळण तर सौ. मीना मोकाशी यांनी देशभक्तीपर गीत
सादर केले. प्रा. श्री. मायाप्पा पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर संस्थेच्या सचिव सौ. प्रियांका गोजगेकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *