Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

कर्नाटकात पुन्हा भाजपाची सत्ता : रमेश जारकीहोळी

संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक विधानसभेची निवडणूक २०२३ मध्ये होत आहे. सदर निवडणुकीत भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते शिवकृपा कार्यालयात बोलत होते. ते पुढे म्हणाले, कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा निर्विवाद बहुमत मिळविले यात तीळमात्र शंका नाही. सहा वर्षे भाजपाला चिंता …

Read More »

ईश्वरप्पा यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

लवकरच दोषमुक्त होण्याचा विश्वास, चाहत्यांच्या समर्थनार्थ घोषणा बंगळूर : ग्रामीण विकास व पंचायत राज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी गुरूवारी घोषणा केल्याप्रमाणे आज (ता. १५) सायंकाळी सुमारे सव्वाआठ वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मंजूर केला आहे. ईश्वरप्पा यांच्यावर कंत्राटदार संतोष पाटील यांना आत्महत्या …

Read More »

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्येमागे काँग्रेसचा हात! : प्रल्हाद जोशी

बेंगळुर : कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरण मागे काँग्रेसचा हात असून त्यांच्या हावभावावरून हि बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, मंत्री ईश्वरप्पा यांचा राजीनामा पक्षाने जड अंतःकरणाने स्वीकारला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. विजापूर जिल्ह्यातील तोरवी येथे लक्ष्मी नरसिंह देवस्थानात दर्शनासाठी …

Read More »

जिल्हा श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी विविध योजना

बेळगाव : कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे श्रमिक पत्रकारांना विविध सुविधा देण्यात येत असून, त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे गौरवाध्यक्ष भीमशी जारकीहोळी यांनी केले आहे. बेळगावात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना भीमशी जारकीहोळी यांनी जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या आगामी योजनांची माहिती दिली. पत्रकारांना आरोग्य …

Read More »

विद्या आधारचा विद्यार्थी नम्रता देसाईला आधार!

बेळगाव : शांताई विद्या आधारतर्फे आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली असून गरजू आणि गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे हा शांताई विद्या आधारचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन शांताईचे संचालक माजी महापौर विजय मोरे यांनी केले. बेकवाड, तालुका खानापूर येथील नम्रता देसाई या विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी शांताई विद्या आधारतर्फे 21,000/- …

Read More »

जागतिक कला दिन साजरा

बेळगाव : विविध कलाकारांनी मिळून बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे जागतिक कला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक ललित कला अकादमीचे जयानंद मादार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नियती फौंडेशनच्या अध्यक्षा सोनाली सरनोबत, कन्नड आणि संस्कृती खात्याच्या विद्यावती बजंत्री, ज्येष्ठ कलाकार बी. ए. पत्तार, बाळू सदलगी व्यासपीठावर होते. …

Read More »

21 वर्षानंतर शाहु महाराजांच्या भूमीचा पृथ्वीराजने अभिमान वाढविला : पालकमंत्री सतेज पाटील

पुढील महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित केले जाणार कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरला 21 वर्षानंतर यश मिळाले. शाहु महाराजांच्या भूमीचा पृथ्वीराजने अभिमान वाढविला आहे. सोबतच, इतर वजन गटातील दैदिप्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल 18 कुस्तीगीरांचेही अभिनंदन करुन कुस्ती स्पर्धेतील या यशाबद्दल सर्व पैलवानांचा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास …

Read More »

डॉ. मुरगुडे यांना नेत्रसेवेने श्रध्दांजली

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे त्यांच्या धर्मपत्नी डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या कु. सिया मुरगुडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा नेत्रसेवेचा वारसा आता हुबळी येथील एम.एम.जोशी नेत्र विज्ञान संस्था पुढे चालविणार असल्याचे कम्युनिटी इन्चार्ज संजय कुलकर्णी, कुतबुद्दीन मुल्ला (सीईओ) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. येथील डॉ. मुरगुडे इस्पितळात …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे स्वप्न साकारले : अ‍ॅड. प्रमोद होसमनी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिका आवारातील बागेला (गार्डनला) घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामकरण करण्यात आले पण पुतळा उभारण्याचे कार्य गेल्या कांही वर्षांपासून राहून गेले होते. शुक्रवार दि. 14 रोजी पुतळा उभारणेच्या कार्याचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांचे हस्ते करण्यात आल्याचे नगरसेवक अ‍ॅड. प्रमोद होसमनी यांनी सांगितले. नगराध्यक्षा सौ. …

Read More »

खानापूर मऱ्याम्मा देवीच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या महाप्रसादाला हजारोंची उपस्थिती

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर पंचक्रोशीतील ग्रामदैवत मऱ्याम्मा देवीच्या इमारतीचा जिर्णोध्दार करून मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व उद्घाटन सोहळ्यानिमित्त शुक्रवारी दि. १५ रोजी आयोजित महाप्रसादाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. खानापूर शहरातील ग्रामदैवत श्री मऱ्याम्मा देवीच्या मंदिराचा मुर्ती प्राणप्रतिष्ठाप्राणा व उद्घाटन सोहळ्यानिमित्त मंगळवारी दि. १२ पासुन विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला. मंगळवार दि. …

Read More »