Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

भाजपला राज्यात येऊ देणार नाही! शरद पवारांचा युवा आमदारांसमोर एल्गार

मुंबई : भाजपने राज्यात पुन्हा सत्तेत परतण्यासाठी कंबर कसली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शड्डू ठोकला आहे. महाविकास आघाडीमधील युवा आमदारांनी आज शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी भाजपला राज्यात सत्तेत येऊ देणार नसल्याचा एल्गार केला. दुसरीकडे त्यांनी युवा आमदारांना कानमंत्र देताना …

Read More »

मुलगा होत नाही म्हणून पत्नीला पेटवून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप

कोल्हापूर : तीन मुलीनंतर मुलगा होत नसल्याने आई-वडिलांच्या चिथावणीवरून अंगावर रॉकेल ओतून पेटवून पत्नीला ठार मारणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर (वर्ग 1) श्रीमती एस आर पाटील यांनी पतीला जन्मठेप व सासू सासर्‍याला दोन महिने कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली. पती अल्ताफ बुडेलाल उर्फ दादेसाब चमनशेख, सासरा बुढेलाल जीनसाब …

Read More »

अनिल परब निकटवर्तीयाच्या 26 मालमत्तेवर छापे आयकर छापे

मुंबई : प्राप्तिकर विभागाने राज्यातील २६ ठिकाणांवर शोध मोहिम राबवली होती. ८ मार्च रोजी मुंबईतील केबल ऑपरेटर्स, राज्य सरकारी कर्मचारी आणि व्यावसायिकांशी संबंधितांच्या ठिकाणांवर छापे टाकले गेले. यामध्ये मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या मालमत्तेवर छापा टाकला गेला. एकूण २६ ठिकाणी केलेल्या या शोधमोहिमेत जवळपास ६६ लाख रुपयांची रोकड …

Read More »

बेळवट्टी गावचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात निवेदन

बेळगाव : बेळवट्टी गावाचा वीज पुरवठा दररोज खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे येथील गावातील अनेक कामे करण्यास व्यत्यय येत आहे, त्यामुळे या समस्येला कंटाळून आज बेळवट्टी गावच्या ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी गांधीनगर येथील हेस्कॉम कार्यालयाला भेट देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा याबाबत निवेदन दिले. बेळवट्टी गावांमध्ये वीज पुरवठा सातत्याने …

Read More »

संकेश्वरात फळांचा राजा आंबा दाखल

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे. देवगड हापूस आंब्याची जेमतेम आवक सुरु असून आंब्याचा प्रति डझन दर २ हजार रुपये आहे. हंगामाच्या प्रारंभीचा देवगड हापूस आंबा गोड रसाळ असला तरी तो केवळ धनीकांचा बनलेला दिसत आहे. आंब्याचा प्रति डझन दोन हजार रुपये दर सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या …

Read More »

चोरी करण्यासाठी आले अन् स्वतःची गाडी सोडून गेले!

निपाणी चोरट्यांचा प्रताप : विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे टाळला अनर्थ निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. गुरुवारी (ता.१७) पहाटे तीन ते चार या वेळेत प्रगतीनगरमध्ये दोन ठिकाणी सराईत चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. दरम्यान  विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. यावेळी पोलिसांना वेळीच पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी घटनास्थळीच …

Read More »

वकिलांना मारहाण केल्यामुळे; कामकाजावर बहिष्कार

बेळगाव : पोलिसांनी वकिलांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याची घटना आज गुरुवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार काल बुधवारी रात्री कॅम्प येथील आयनॉक्स चित्रपटगृहांमध्ये दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. हे भांडण तेथे उपस्थित असलेल्या कांही वकिलांनी सोडवून मारामारी …

Read More »

अप्पू यांना लवकरच ‘कर्नाटक रत्न’ पुरस्कार देणार : मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुरू : दिवंगत पुनीत राजकुमार आम्हाला सदैव प्रेरणादायी आहेत. त्यांना ‘कर्नाटक रत्न‘ पुरस्कार देण्याबाबत लवकरच बैठक घेऊन तारीख जाहीर करण्यात येईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळुरातील आरटी नगरातील निवासस्थानी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आपले सर्वांचे लाडके अप्पू मेगास्टार पुनीत राजकुमार यांचा आज 47वा जन्मदिन आहे. ते …

Read More »

कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे

माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणीत डिजिटल मतदार नोंदणी कार्यक्रम निपाणी(वार्ता) : राज्यात निवडणूकांचे वारे वाहू लागले असून भाजपा सरकारच्या पाया खालची वाळू सरकली आहे. जनहिताच्या विरोधात सुरू असलेल्या कामकाजामुळे विद्यमान भाजपा सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना अखेर गुजरात राज्याबरोबरच कर्नाटकातही निवडणूका लागण्याची शक्यत आहे. पक्षाच्या सर्व …

Read More »

हॉटेल फेअरफिल्ड मॅरियटमध्ये चोरी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बेळगाव : शहराच्या बाहेरील काकती येथे असलेल्या मॅरियट येथील प्रतिष्ठित स्टार हॉटेल फेअरफिल्डचे व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांवर सुरक्षेशी तडजोड करणे आणि पाहुणे नसताना हॉटेल रूमचा गैरवापर केल्याप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुमारे 9 ते 10 लाख रुपये किमतीच्या हिऱ्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार स्थानिक काकती पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल करण्यात …

Read More »