Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

सौंदलगा येथील ऐतिहासिक बुरुजाचे जतन करण्यासाठी युवावर्गात जागृती

सौंदलगा : सौंदलगा येथील ऐतिहासिक बुरुजाची युवा वर्गाकडून स्वच्छता करून ऐतिहासिक बुरुजाची जतन करण्यासाठी युवावर्गात जागृती झाली आहे. या शेवटच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे काळाची गरज असून त्यासाठी सौंदलग्यातील युवकवर्ग पुढे सरसावला आहे. सौंदलगा गावात ऐतिहासिक असा भुईकोट किल्ला होता. मात्र काळाच्या ओघात त्याचे अवशेष संपले असून त्या भुईकोट किल्ल्याचा …

Read More »

खानापूर शहरासह तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी खानापूर शहरातील शिवस्मारक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शासकीय कार्यालयाच्यावतीने तहसीलदार प्रवीन जैन यांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले. तर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने माजी आमदार व खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष …

Read More »

खानापूर तालुका विकास आघाडीची स्थापना

खानापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन खानापूर तालुका विकास आघाडी स्थापना निमित्ताने पत्रकार परिषद खानापूर शहरातील शिवस्मारक येथील सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष भरमाणी कल्लापा पाटील होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर तालुक्यात परकीयांचे आक्रमण होऊन राजकरण दुषीत झाले आहे. तालुक्यातील सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार …

Read More »

पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षणसाठी डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांची निवड

निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील समाजसेवी वैद्यकीय सेवा देणारे डॉ. संजय पंत व डॉ.श्रद्धा पंतबाळेकुंद्री यांचे चिरंजीव डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांची पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षणसाठी ‘ऑल इंडिया कौन्सिलिंग’ मधून पहिल्या फेरीत एम.डी. मेडिसिन प्रशिक्षणसाठी वर्धा (नागपूर) येथे जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे. डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांचे वैद्यकीय एमबीबीएस शिक्षण …

Read More »

अंडी महिला, मुलांना दंड मात्र अंगणवाडी सेविकांना

राजेंद्र वड्डर यांचा आरोप : सरकारचा अजब कारभार निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या महिला आणि बाल विकास खात्याकडून गरोदर महिला, बाळंतिस, लहान मुलांना देण्यात येत असलेल्या अंडी हे सरकारचे चांगले उपक्रम आहेत. पण प्रत्यक्षात अंडी लाभार्थ्यांना आणि दंड मात्र अंगणवाडी सेविका, शिक्षिकाना असेच प्रकार घडतअसल्याचे आरोप भोज जिल्हा पंचायत माजी …

Read More »

जिल्हा इस्पितळ परिसरात मराठी भाषेत फलक लावावेत : म. ए. समितीचे निवेदन सादर

बेळगाव : मराठी भाषिक रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात सर्वत्र मराठी भाषेतदेखील फलक लावण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. भारत सरकारच्या भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांनी भाषिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार आणि बेळगावच्या उपायुक्तांना सूचना दिल्या होत्या . उपायुक्तांनी मराठी लोकप्रतिनिधींशी …

Read More »

हिजाब ही ईस्लामची अनिवार्य धार्मिक प्रथा नाही; सरकारचा उच्च न्यायालयात युक्तीवाद

बंगळूर : कर्नाटक सरकारने शुक्रवारी कर्नाटक उच्च न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला, की हिजाब ही इस्लामची अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही आणि त्याचा वापर प्रतिबंधित केल्याने धार्मिक स्वातंत्र्याची हमी देणाऱ्या भारतीय संविधानाच्या कलम २५ चे उल्लंघन होत नाही. राज्याचे महाधिवक्ता प्रभुलिंग नावदगी यांनी न्यायमूर्ती अवस्थी, न्यायमूर्ती जे. एम. खाझी आणि न्यायमूर्ती कृष्णा …

Read More »

असोगा रेल्वे गेट बंदच, प्रवाशांचे हाल

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव- लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण काम युध्दपातळीवर सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील असोगा रेल्वे गेटचे काम गेल्या शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसापासून असोगा रेल्वेगेट बंदच त्यामुळे असोगा परिसरातील मन्सापूर, बाचोळी, कुन्टीनोनगर, त्याचबरोबर मणतुर्गा, नेरसा भागातील नागरिकांचे तसेच दुचाकी वाहनधारकांचे व ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनधारकांना …

Read More »

हिजाबला विरोध नाही : ए. बी. पाटील

संकेश्वर (प्रतिनिधी) : एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित कला-विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास आम्ही बंदी केलेली नाही. पण वर्गात हिजाब घालण्यास मनाई केल्याचे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, हिजाब हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणे इष्ट …

Read More »

बैलूर प्राथ. कृषी पत्तीन सोसायटीच्या नुतन इमारत, गोडाऊनचा काॅलम भरणी कार्यक्रम संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बैलूर गावच्या प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीच्या नुतन इमारत व गोडाऊनचा काॅलम भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. या इमारतीसाठी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ३० लाखाचा निधी मंजुर कामाचा शुभारंभ केला. यावेळी माजी आमदार व डीसीसी …

Read More »