Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

खानापूर तालुक्यात ऊसाची उचल उशीरामुळे ऊसाला तुरे

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी परिसरासह नागुर्डा, तसेच पश्चिम भागात अवकाळी पावसामुळे एक महिना ऊसाची उचल उशीरा झाली. त्याचा परिणाम झाल्याने सध्या तालुक्याच्या गर्लगुंजी परिसरासह नागुर्डा, तसेच पश्चिम भागातील शिवारात ऊसाला तुरे सुटले आहेत. जानेवारी महिना संपत आला. तसा ऊसाची उचल करणे गरजेची होती. अवकाळी पावसामुळे तसेच साखर कारखान्याच्या …

Read More »

खानापूर अंगणवाडी सेविकांची निवड यादी तब्बल 6 महिन्यानंतर जाहिर

खानापूर (वार्ता) : गेल्या कित्येक वर्षानंतर खानापूर तालुक्यातील 15 अंगणवाडीत नेमणुकीचे आदेश देण्यात आले. तेव्हापासून तालुक्यातील महिलावर्गातुन समाधान पसरले होते. अनेक महिलांनी पैसे खर्च करून अर्ज केले. गेल्या सहा महिन्यापासून नोकरीची अपेक्षा करणार्‍या अंगणवाडी शिक्षिकाची यादी तब्बल सहा महिण्यानंतर जाहिर झाली आहे. तेव्हा कुणाला आक्षेप नोंदवायचा असल्यास 27 जानेवारीच्या आत …

Read More »

रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

बेळगाव (वार्ता) : जुन्या धारवाड रोड येथील रेल्वे गेटच्या ठिकाणी तीन वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याची दिवसेंदिवस दुर्दशा होत असून त्यावरून वाहने चालविणे धोकादायक बनत चालले आहे. जुन्या धारवाड रोड येथील रेल्वे गेटच्या ठिकाणी 24 जानेवारी 2017 रोजी बांधकामाला सुरुवात करण्यात आलेला हा रेल्वे ओव्हर …

Read More »

विकेंड कर्फ्यु हटताच; खासबाग येथील आठवडा बाजारात गर्दी!

बेळगाव (वार्ता) : देशातील कर्नाटकसह पाच राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढत असतानाही राज्य सरकारने शनिवार व रविवारी लागू करण्यात आलेला विकेंड कर्फ्यु मागे घेतला आहे. परिणामी शहरातील खासबागच्या रविवारच्या आठवडी बाजारात आज रविवारी पुन्हा एकदा खरेदीसाठी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली. कोरोनाला निमंत्रण देणारी ही गर्दी चिंतेचा विषय बनली आहे. …

Read More »

पोलिसांसाठी रोगप्रतिकारक औषध वितरण

बेळगाव (वार्ता) : पोलीस दलात देखील कोरोना बाधितांची संख्या वाढली असल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांमधील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डॉ. श्रीनिवास पाटील यांनी पोलिस आयुक्तांकडे नुकतीच आयुर्वेदिक औषधे सुपूर्द केली. कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेवेळी येथील प्रोजेन रिसर्च लॅबचे डॉ. श्रीनिवास पाटील यांनी पोलिसांसाठी मोफत औषध पुरवली होती. समाज आणि …

Read More »

बेळगाव शिवसेनेतर्फे गरजूंना मास्क, ब्लँकेट्सचे वाटप

बेळगाव (वार्ता) : बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आज रविवारी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मान. बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना फेसमास्क आणि ब्लँकेट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी गरजू लोकांना फेसमास्क आणि ब्लँकेटचे …

Read More »

विद्यार्थ्याच्या उदात्त कार्याचा महेश फाउंडेशनकडून गौरव

बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिर येथे रस्त्याशेजारी फुटपाथवर असहाय्य अवस्थेत बसलेल्या एका निराधार वृद्ध महिलेला निराश्रितांच्या निवारा केंद्रात आसरा मिळवून देण्याचे उदात्त कार्य केल्याबद्दल एका गरीब होतकरू विद्यार्थ्याला महेश फाउंडेशनचे प्रमुख महेश जाधव यांनी आज नवी कोरी सायकल बक्षिसादाखल देऊन गौरविले. याबाबतची माहिती अशी की, पृथ्वीराज पी. श्रेयकर …

Read More »

युवा समितीच्यावतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे सीमा लढ्यामध्ये योगदान हे उत्तुंग आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ज्या वेळेला महाजन अहवाल लादण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या …

Read More »

गिनीज बुक रेकॉर्डची जलपरी सई पाटीलचा निपाणीत सत्कार

निपाणी (वार्ता) : मुंबईमधील जलपरी सई अशिष पाटील (वय१०) हिने १४ डिसेंबर २०२१ या दिवसापासून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सायकलने प्रवास करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवलेले आहे. त्यामुळे सई पाटीलचा निपाणी येथे प्रथमच भारत बिडी वर्क्सतर्फे रमेश पै यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. …

Read More »

समाजाच्या गरजा आणि व्यथा यांचे भान पत्रकारांनी ठेवणे गरजेचे : पत्रकार उपेंद्र बाजीकर

बेळगाव : अनेक संकटांच्या छायेतून सध्या समाजाची वाटचाल सुरू आहे. दिशाहीन झालेले राजकारण समाजाची फरफट करीत आहे. अशावेळी बदलत्या समाजाच्या गरजा आणि व्यथा यांचे भान पत्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे. त्यामधूनच अधिक सक्षम पत्रकारिता करता येईल, असे विचार स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी व्यक्त केले. बेडकीहाळ येथील कै. बी. एन. …

Read More »