Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

हिंदू सणावरील निर्बंधाबाबत तहसीलदारांना आज निवेदन

  श्री सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ : संभाजी चौकात जमण्याचे आवाहन निपाणी : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यासाठी येथील श्री सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ व निपाणी परिसरातील गणेश उत्सव मंडळ व्यावसायिकांच्या वतीने महादेव मंदिर येथे पहिली बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर रविवारी (ता.15) नगरसेवकांच्या दुसरी बैठक झाली. त्यामध्ये हिंदू सणावर …

Read More »

नुकसानग्रस्तसह बेरोजगार कुटुंबांना अक्कोळ येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

निपाणी : कोरोना काळात रोजगाराविना हालाखीचे जीवन काढणार्‍या अक्कोळ येथील 29 कर्मचार्‍यांना तसेच अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या 43 कुटुंबाना शासनाकडून उपलब्ध झालेल्या व जोल्ले उद्योग समूहाच्यावतीने जीवनावश्यक कीटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अक्कोळ येथील जोल्ले उद्योग समूह कार्यालयात आयोजक कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बापूसाहेब पाटील (कट्टीकल्ले) होते. प्रारंभी शाखाधिकारी प्रदीप देसाई यांनी …

Read More »

कोगनोळी जवळ अपघातात दोन कारचे नुकसान

दोघे जण किरकोळ जखमी : कारचे हजारो रुपयांचे नुकसान कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या आरटीओ ऑफिस जवळ दोन कारच्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 16 रोजी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, मारुती कार क्रमांक एमएच 12 के.टी. 9934 ही गाडी निपाणीहून कोल्हापूरकडे जात …

Read More »

बोगुर आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती करा

खानापूर (प्रतिनिधी) : बोगुर (ता. खानापूर) गावात गेल्या आठ वर्षापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी करण्यात आली. परंतु जनतेच्या सेवेसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्स, सेविका आदीची सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी बोगुर गावच्या नागरिकांनी भाजप नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली तालुका आरोग्य अधिकारी …

Read More »

खानापूर नगरपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या आवारात 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन रविवारी उत्साहाने साजरा करण्यात आला. कोविड-19चे नियम पाळत नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या हस्ते अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकविण्यात आला. प्रारंभी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी स्थायी कमिटी अध्यक्ष …

Read More »

’यशस्विनी’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार

बेळगाव : देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून यशस्विनी उद्योजक संस्थेतर्फे आज ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी यांचा सत्कार करण्यात आला. यशस्विनी उद्योजक संस्थेचे अध्यक्ष कुमार कोटूर यांच्या अध्यक्षतेखाली याळगी यांच्या निवासस्थानीच हा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्यात आल्यानंतर कुमार कोटूर यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक …

Read More »

आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा; आकाश हलगेकर यांचा स्तुत्य उपक्रम

बेळगाव : कंग्राळी गल्ली, बेळगाव येथील एक हरहुन्नरी समाजसेवक आकाश हलगेकर आणि मित्र परिवारातर्फे किल्ल्याजवळील झोपडपट्टी येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु त्यांच्या चार वर्षांनंतर देखील आपल्या देशातील गरीब आणि गरजूंना स्वातंत्र्य …

Read More »

सीमाप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी पाटील मळा कंग्राळी खुर्द येथून पंतप्रधानांना पत्रे

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आवाहनाला प्रतिसाद बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी,भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या ६५ वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले, काहींनी तर आपले बलिदान गेले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सीमाप्रश्‍नी मा.पंतप्रधानांनी लक्ष घालून सीमाप्रश्न लवकरात लवकर …

Read More »

नामदेव पत्ताडे यांना ‘ऑगस्ट क्रांती पुरस्काराने’ सन्मानित…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : एलआयसी विमा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर विभागातील गडहिंग्लज शाखेचे विमा प्रतिनिधी नामदेव धोंडीबा पत्ताडे यांना नुकताच ‘ऑगस्ट क्रांती पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. नामदेव पत्ताडे हे चंदगड तालुक्यातील विंझणे या गावचे विमा प्रतिनिधी म्हणून मागील १० वर्षांपासून काम करत असताना, त्यांनी गाव-खेड्यातील लोकांना विम्याचे महत्त्व, …

Read More »

वर्गमित्रानी घडविले माणुसकीचे दर्शन…

मित्राच्या निधनानंतर संवगड्यानी केली मदत चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : तडशींनहाळ गावातील तरुण कै.मोहन कांबळे यांचे गेल्या जून महिन्यात निधन झाले. अचानक त्यांच्या जाण्याने त्यांचा कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, २ मुली आहेत. वरील झालेली दुर्देवी घटना समजताच कधी काळी आपल्या सोबत खेळणारा आणि एकाच डब्यातील भाकरी …

Read More »