Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण

निपाणी : देश कोरोनाच्या महामारीशी लढत आहे. यामध्ये अग्निशामक दलही जिवाचे रान करून  जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात प्रथमदर्शी कोरोना योद्धे म्हणून अग्निशामक दल काम करत आहेत. त्याची दखल घेऊन कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने ‘आपले अग्निशामक दल, आपला अभिमान’ अंतर्गत चिकोडी जिल्हा काँग्रेस व निपाणी  …

Read More »

जवाहरच्या पाणी पातळीत 3 फूटांनी वाढ

शिरगुप्पी परिसरात धुवाधार पाऊस : लवकरच होणार तलाव ओव्हरफ्लो निपाणी (संजय सूर्यवंशी ) : निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावात चार दिवसापूर्वी 36 फुट 3 इंच इतकी पाणीपातळी होती. सदर पाणीसाठा दोन महिने पुरेल इतका होता. पण गेल्या दोन दिवसापासून निपाणी शहर आणि शिरगुप्पी डोंगर परिसरात दमदार पाऊस होत आहे …

Read More »

चिक्कोडीत पावसाचा जोर! कृष्णेच्या पातळीत 5 फुटाने वाढ

चिक्कोडी : चिक्कोडी उपविभागातील चिक्कोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरूच आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने शुक्रवारी (ता. १८) देखील कृष्णा नदीवरील एक, दूधगंगेवरील चार व वेदगंगेवरील तीन असे आठही बंधारे पाण्याखालीच होते. पाऊस कायम असल्याने कृष्णेच्या पातळीत पाच तर दूधगंगा व वेदगंगा …

Read More »

हालगा-मच्छे बायपासमधील शेतकऱ्यांना पोलीस खात्याने संरक्षण द्यावे

बेळगाव : मा.उच्च न्यायालयाचा आदेश तसेच बेळगाव दिवाणी न्यायालयाने हालगा-मच्छे बायपास प्रकरणी झिरो पॉईंट ग्रहित झाल्याशिवाय बायपासचे कोणतेही काम सूरु करु नये असा निर्वाळा देत दावा सुरु आहे. पण त्या सर्व आदेशांना हरताळ फासत आताच नवीन रुजू झालेले प्रांताधिकारी, महामार्ग प्राधिकरण खात्याचे मुख्य अधिकारी, तहशिलदार, ठेकेदार मिळून बायपासमधील शेतकऱ्यांना वैयक्तिक …

Read More »

आणि जोशी कॉलनीतील अडकलेल्या पाण्याचा श्वास झाला मोकळा!

बेळगाव : शहर परिसरात बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे शाहुनगर येथील जोशी कॉलनीत आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी केरकचर्‍यामुळे साठून राहिल्याने लोकांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच शहराचे आमदार अनिल बेनके आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पालिका कर्मचार्‍यांना बोलावून सूचना करण्यात आल्या. त्वरित साठून …

Read More »

इंधन दरवाढीचा भडका कायम; पेट्रोल १०३ रुपयांवर, डिझेल ९५ रुपयांवर!

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरुच असून शुक्रवारी पेट्रोल दरात 27 पैशांची तर डिझेल दरात 28 पैशांची वाढ करण्यात आली. ताज्या दरवाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल दराने 103 रुपयांची तर डिझेल दराने 95 रुपयांची पातळी ओलांडली.तेल कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरात वाढ केली नव्हती. पण जागतिक …

Read More »

खानापूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच

खानापूर (प्रतिनिधी) : चौथ्या दिवशी खानापूर शहरासह तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याचा स्त्रोत वाढत आहे.तालुक्यातील अनेक नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्याच्या शिवारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शिवारातील कामे बंद झाली आहेत.तालुक्यातील हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारूतीचे मंदिर पूर्णपणे बुडून गेले आहे. मलप्रभा …

Read More »

गडहिंग्‍लज-आजरा मार्गावर चालत्‍या दुचाकीवर झाड पडून आजी-नातू ठार

गडहिंग्लज : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज-आजरा मार्गावर हॉटेस सूर्यासमोर आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, गडहिंग्‍लज-आजरा मार्गावर चालत्‍या दुचाकीवरच झाड कोसळल्‍याने यामध्ये शांताबाई पांडुरंग जाधव (वय ७५, रा. लिंगनूर नूल, ता. गडहिंग्लज) व नातू …

Read More »

धक्कादायक! ब्लॅक फंगसमुळे मुबंईत तीन मुलांचे काढले डोळे

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसीस)चा धोका वाढत आहे. या आजाराने लहान मुले आणि १६ वर्षांपर्यंतच्या तरुणांना लक्ष्य केले आहे. हा आजार इतका गंभीर रुप धारण करत आहे की, त्यामुळे तीन मुलांचे डोळे काढावे लागले आहेत. ही तीनही मुले वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत होती. याबाबतचे वृत्त एका …

Read More »

मासेमारीस गेलेल्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

बेळगाव : मासेमारीसाठी गेलेल्या एका मुलाचा जमिनीवर पडलेल्या विद्युत वाहिनीतील विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना अनगोळ तलावाच्या ठिकाणी आज गुरुवारी सकाळी घडली. विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नांव विकास संजू मोघेरा (वय 14 वर्षे, रा. अनगोळ) असे आहे. विकास हा आज सकाळी अनगोळ येथील तलावाच्या ठिकाणी मासे …

Read More »