Sunday , December 14 2025
Breaking News

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप भारत-न्यूझीलंड सामना; पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया

Spread the love

साऊदम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला आहे. पावसाची संततधार आणि मैदानातील ओलावा पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. १८ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या या सामन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे या सामन्यासाठी नाणेफेकही झाली नाही. या सामन्यासाठी आयसीसीने एक दिवस राखीव ठेवला आहे. जर ४ दिवसात निकाल लागला नाही. तर राखीव दिवसाचा वापर केला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होणार होता. मात्र पावसामुळे पंचांनी काही काळ वाट बघितली. मात्र पावसाची संततधार सुरु असल्याने आजच्या दिवशीचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. साऊदम्पटनच्या हॅम्पशायर बाऊलमध्ये आतापर्यंत ६ कसोटी सामने झाले आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ दोनदा सामना जिंकला आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ एकदाच सामना जिंकला आहे.
एक्यू वेदरने दिलेल्या वृत्तानुसार पुढील २४ तास साऊदम्पटनमध्ये थांबून थांबून पाऊस पडणार आहे. तपमानाबद्दल बोलायचं झाल्यास साऊदम्पटनचं शुक्रवारचं सर्वाधिक तापमान हे १६ अंशांपर्यत तर किमान १२ अंशांपर्यत राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी दिवसभर थंड वातावरण असेल. याच अल्हाददायक थंडीमध्ये साऊदम्पटनच्या हॅम्पशायर बाऊल मैदानात मंगळवारपर्यंत सामना खेळवला जाणार आहे. या पाच दिवसांदरम्यान सर्वाधिक तापमान हे १८ अंशांपर्यंत तर किमान ११ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पाच दिवसांदरम्यान हवेतील आर्द्रता ९० टक्क्यांपर्यंत असेल

About Belgaum Varta

Check Also

टी-20 क्रिकेट विश्वचषक 2026चे बिगुल वाजले; 7 फेब्रुवारीपासून सुरुवात

Spread the love  मुंबई : टी-20 क्रिकेट विश्वचषक 2026च्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. भारत-श्रीलंका या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *