बेळगाव : जिव्हाळा ही संस्था महिलांनी स्थापन केलेली आहे त्यामुळे संस्थेमध्ये बहुतांश महिलांचा सहभाग आहे. या संस्थेतर्फे मोफत रुग्णवाहिका, शववाहिका, शवदहन सेवा, स्वच्छता अभियान, अश्या विविध सेवा पुरविल्या जातात.
आज जिव्हाळा संस्थेतर्फे गरजूंना रेशन किटचे वितरण करण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून संस्थेला हातभार लावलेल्या देणगीदारांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी देणगीदार संतोष तलपतूर, श्रीनिवास नारायण गुडमट्टी, श्रीमती भारती दयानंद चौगुले आणि डॉ. रचना नगोळ यांनी उपस्थिती दर्शविली. मान्यवरांच्या हस्ते शाळेतील आणि हॉस्पिटलमधील सफाई कामगार व समाजातील विविध गरजवंताना रेशन किटचे वितरण करण्यात आले. तसेच संस्थेच्या सहसचिव स्मिता शिंदे यांचे चिरंजीव नैतिक शिंदे याने आपले साठवलेले पैसे गरजूंना देणगीदाखल दिले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती माधुरी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता कद्दु यांनी संस्थेचे कार्य विस्तारित केले. संस्थेच्या कोषाध्यक्षा श्रीमती ज्योती मिरजकर यांनी देणगीदारांचे स्वागत केले. संस्थेच्या संयुक्त कोषाध्यक्षा श्रीमती योगिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आरती निपाणीकर यांनी आभार मानले.
याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती राजश्री अनगोळ, सहसचिव श्रीमती स्मिता शिंदे, कार्यकारी सदस्य वृषभ अवलक्की, शहाबाज जमादार, गजानन हावळ व इतर मान्यवर उपस्थित होते.