खानापूर : खानापूर तालुक्यात लम्पिने धुमाकुळ घातला आहे. लम्पिमुळे तालुक्यात अनेक जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
कारलगा येथे लम्पिमुळे सुनील मनोहर पाटील यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. कारलगा येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडे मदत मागितली त्यांनी तात्काळ पशु कल्याण विभागाचे उपसंचालक डॉ. कुडगी यांना वैयक्तिकरित्या या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली व संपूर्ण चौकशी करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याची विनंती केली. दोन दिवसांपूर्वी त्याच शेतकऱ्यांची गाय देखील दगावली आहे तेव्हा देखील सरनोबत यांनी अधिकाऱ्यांसमवेत कारलगा येथे भेट दिली व शेतकऱ्यांचे सांत्वन केले. इतर जनावरांची कशाप्रकारे काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. व यापुढे देखील आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय अनंत पाटील, उपाध्यक्ष रवींद्र बाळाराम सुतार, परशराम यल्लारी घाडी व संदीप परशराम सुतार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta