खानापूर (प्रतिनीधी) : खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर बाबासाहेब माने याची बढतीनिमित्त चिकोडी येथे बदली झाली. त्यामुळे खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर पद रिक्त होताच, त्याच्या जागी विजापूर येथून बढतीनिमित्त खानापूर चीफ ऑफिसर म्हणून आर. के. वटारे यांची वर्णी लागली. लागलीच त्यांनी चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांच्याकडून कामाची सुत्रे हाती घेतली.
यावेळी चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी २०१८ – १९ सालात खानापूर शहराची ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा भरविण्यात आली. या यात्रेच्या काळात खानापूर शहरांच्या विकासासाठी ४ कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून अनेक विकासकामे केली. तसेच अतिवृष्टीमुळे खानापूर शहरातील जवळपास १०० घराची पडझड झाली होती. त्या १०० घराना निधी मंजुरीसाठी प्रयत्न करून करून घरे उभारण्यास प्रयत्न केले.
चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांच्या काळात अनेक विकासकामे करण्यात आली.
नुतन चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांनी खानापूर नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसर पदाचा पदभार स्विकारला.
यावेळी स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलुरकर, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक आपय्या कोडोळी, नारायण ओगले, महम्मद रफिक वारेमणी, नगरसेविका मिनाक्षी बैलुरकर आदींनी नुतन चीफ ऑफिसर आर. के. वटारे यांचे स्वागत केले.
Belgaum Varta Belgaum Varta