शेतकरीवर्गाची मागणीव्दारे तहसीलदाराना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात भात पीक हे मुख्य पिक आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उत्पादीत झालेले भात विक्री करण्यासाठी एपीएमसी मार्फत भात केंद्र
त्वरीत सुरू करावी.
गेल्या चार वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी वर्गाची अवस्था दयनिय झाली आहे. त्यातच २०१९ साली अतिवृष्टीमुळे व त्यानंतर कोरोनाच्या काळात शेतकरी वर्गाचा संसार उघड्यावर पडला आहे. तो व्यवस्थित चालण्यासाठी शेतकरी वर्गाच्या भाताला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यातच दलाला मार्फत भात खरेदीच्या वेळ होणारी फसवणूक थांबवावी. तसेच सरकारच्या विविध योजनेमार्फत मिळणारे सहाय्यधन व अनुदान थांबविण्यात आले आहे ते पूर्ववत सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या वतीने उपतहसील के. एम. कोलकार यांना देण्यात आले.
यावेळी उपतहसील के. एम. कोलकार यांनी निवेदनाचा स्विकार करून शेतकरी वर्गाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta