खानापूर : चोर्ला घाट दिवसेंदिवस धोकादायक बनत असून अपघाताचे सत्र सुरूच आहे काल रात्री या घाटात महाराष्ट्रातील एमएच 48 बीटी 5968 क्रमांकाची कार खोलदरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू आहेत.
चोर्ला घाटात विल्डरनेस्ट परिसरातील एका वळणावर कार सुमारे 30 ते 40 मीटर खोल दरीत कोसळल्याने यात नूर शेख वय 36 आणि सुधीर कुमार दोघेही राहणार महाराष्ट्र या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर हेन्री फर्नांडिस (वय 63 मुंबई), संतोष भोवर (वय 28 डहाणू मुंबई), नुराणी सौदागर (वय 53 पालघर मुंबई), विनोद कामत ( वय 43 डहाणू मुंबई) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान काल रात्री उशिरा या घटनेची माहिती वाळपई पोलिसांना मिळाल्यावर वाळपई पोलीस घटनास्थळी पोहोचले व जखमी ना गाडीतून बाहेर काढले आणि 108 रुग्णवाहिकेतून इस्पितळात हलवले तसेच वाळपई अग्निशामन दलाने घटनास्थळी दाखल होत दोरीच्या साह्याने गाडीत अडकून पडलेल्या दोघामृत्यूमुखी पडलेल्याना बाहेर काढले.
Belgaum Varta Belgaum Varta