खानापूर : पद्मश्री विभूषित, अध्यात्मिक धर्मगुरू, धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य आशीर्वादाने श्रीदत्त पद्मनाभ पीठ श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठ संचालित संत समाज खानापूर विभाग तर्फे आज गीता जयंतीच्या निमित्ताने संध्याकाळी ठीक 8-9 या वेळेत श्री रवळनाथ मंदिर खानापूर येथे “श्रीमद्भभगवद् गीता – भक्तियोग अध्याय” पठण करण्यात आला.
भगवद्गीता हा सनातन धर्मग्रंथ होय. भगवद्गीता पठणाने आपले आध्यात्मिक मनोबल वाढते आणि या संस्कृत श्लोकांच्या उच्चारामुळे शरीरात सकारात्मक ध्वनी लहरी निर्माण होऊन आरोग्य ही सुदृढ राहते असे प्रतिपादन खानापूर बेळगाव विभाग प्रमुख डॉ. गौरेश भालकेकर यांनी केले. यावेळी त्यांनी भक्तियोग अध्याय शिकविला आणि पूज्य गुरुपीठाची माहिती आणि कार्य या भाविकांना सांगितले. मंदिरात संस्कृती वर्ग सुरू करण्यासंदर्भात ही चर्चा करण्यात आली.
खानापूर येथील तरुण हिंदू धर्माभिमानी भाविकांनी सहभाग दर्शविला. यावेळी श्री. निवृत्ती पाटील, श्री. विश्वनाथ सुतार, श्री. नामदेव गुरव, कु. सोपान पाटील, कु. रवळनाथ गुंजीकर, रवींद्र गुरव, ई. गुरुबंधू आणि भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta