खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराचे नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा भाजपच्या वतीने सत्कार त्यांच्या निवासस्थानी नुकताच करण्यात आला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किरण यळ्ळूरकर, मिडिया प्रमुख राजेंद्र रायका, बाळू सावंत, प्रकाश निलजकर, बबन यळ्ळूरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाळू सावंत यांनी नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांच्याकडे खानापूर शहरातील अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी केली.
यावेळी खानापूर नगरपंचायतीचे नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या समस्या मार्गी लावू असे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta