खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नागरीक गटारीत प्लॅस्टिक, कचरा, सिमेंट पोती टाकून दुषित पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होऊन ड्रेनेज पाईप पॅक होत आहेत. त्यामुळे ड्रेनेज पाईप फुटून दुषित पाणी मलप्रभा नदीच्या प्रवाहात मिसळत आहे, अशी माहिती नगर पंचायतीचे प्रेमानंद नाईक यांनी दिली.
बुधवारी खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटनेच्या वतीने मलप्रभा नदीच्या घाटावर ड्रेनेजचे पाणी मलप्रभा नदीच्या पात्रात मिसळत असल्याचे निदर्शनास आणून नगर पंचायतीचे लक्ष वेधले. त्यामुळे गुरूवारी नगर पंचायतीच्या स्वच्छता कामगारांनी ड्रेनेज पाईपमध्ये अडकलेला कचरा, प्लॅस्टिक पिशव्या, सिमेंट पोती काढुन मार्ग मोकळा केला.
त्यामुळे ड्रेनेज पाईपमधून दुषित पाणी वाहण्यास सोपे झाले. पुन्हा पुन्हा दुषित पाणी मलप्रभा नदीच्या प्रवाहात मिसळू नये यासाठी नगर पंचायत सरकारकडे शहरात ड्रेनेजसाठी सरकारकडे निधीची मागणी करत आहे.
लवकरच खानापूर शहरातील ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
यावेळी नगरपंचायत चीफ ऑफिसर आर.के. वटार, प्रेमानंद नाईक व स्वच्छता कर्मचारी आदी उपस्थित होते.