
खानापूर : खानापूर तालुक्यातील सरकारी आदर्श उच्च प्राथमिक कन्नड शाळा इटगी या शाळेतील 70 विद्यार्थी व 9 शिक्षक व एसडीएमसी सदस्य यांना सुवर्णसौध येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज पाहण्याची संधी भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांच्या प्रयत्नाने उपलब्ध झाली.
इटगी शाळेच्या विद्यार्थ्यांना हिवाळी अधिवेशन पाहण्याची इच्छा आहे हे लक्षात येताच डॉ. सोनाली सरनोबत यांनी भाजपच्या जिल्हा अध्यक्ष व माननीय सभापती यांना लेखी अर्जाद्वारे विनंती केली त्यानुसार सदर विद्यार्थ्यांना 23 डिसेंबर रोजी अधिवेशनाचे कामकाज पाहण्याची संधी मिळाली त्यामुळे इटगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी डॉ. सोनाली सरनोबत यांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta