खानापूर : खानापूर भाजप तक्रार निवारण केंद्राच्यावतीने “हर घर भगवा, हर घर शिवबसव” अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याचे परमपूज्य श्री.चन्नबसव स्वामीजी अवरोळी, परमपूज्य श्री. सिद्ध शिवयोगी शांडिल्यश्वर मठ हिरेमुनवळी, दिव्यसानिध्य दिवयचेतन शिवपुत्र महास्वामीजी आरूढ मठ चिक्कमुनवळी, वेदमूर्ती श्री. गुरुसिद्धय्या स्वामीजी कलमठ पारिश्वाड, शांतय्या स्वामीजी हिरेमठ, भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री. संजय पाटील यांच्यासमवेत शिवबसव प्रतिमा व भगवा ध्वज वाटप अभियान सुरू करण्यात आले.
डॉ. सोनाली सरनोबत उपस्थितांचे स्वागत करताना म्हणाल्या की, तरुणांमध्ये आपली हिंदू संस्कृती वाढविण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी हे अभियान सुरू केली जात आहे. आज आपण स्त्रियांनी भगवतगीता वाचण्याचा व समजून घेण्याचा सराव केला पाहिजे व आपल्या मुलांना देखील ही माहिती दिली पाहिजे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, राष्ट्रभक्ती आणि आत्मशक्ती हे हिंदू धर्म आणि सनातन संस्कृतीचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. स्वामीजींनी अध्यात्माचे महत्व आणि सनातन हिंदू धर्मातील आपले ग्रंथ आणि प्रथा शिकण्याचे महत्व याबद्दल सांगितले.
भाजपा अध्यक्ष संजय पाटील बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरु बसवेश्वर यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. अश्या मोहिमेतून हिंदू श्रद्धा बळकट होईल.
यावेळी किरण येळ्ळूरकर, राजेंद्र रायका, चंद्रकांत कोलकार, अर्जुन गावडे, अनंत गावडे, ईश्वर सानीकोप, रोशन सुतार, बाळेश चव्हाणनवर, नागेश रामजी, अनिता कोमसकर, गंगुताई तलवार, काव्या आणि डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक कार्यकर्त्यांकडून खानापूरमध्ये घरोघरी भगवा ध्वज आणि शिवबसव फोटो फ्रेम वाटप केले जाणार आहे. यापूर्वी देखील भाजपतर्फे डॉ. सोनाली सरनोबत यांच्या पुढाकाराने भारत माता छायाचित्र आणि तिरंगा मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली होती.