खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरपासून जवळ असलेल्या के. पी. पाटील नगरात श्री साई प्रतिष्ठान व खानापूर तालुका कुस्ती आखाड्याच्यावतीने कर्नाटक राज्याचे शिवसेना उपाध्यक्ष के. पी. पाटील यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त येत्या १० फेब्रुवारी रोजी भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बरगाव फाट्याजवळील के. पी. नगरात आयोजित पत्रकार परिषदेत के. पी. पाटील यांनी बोलताना दिली.
बैठकीच्या अध्यस्थानी श्री साई प्रतिष्ठानाचे अध्यक्ष के. पी. पाटील होते.
व्यासपीठावर खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष डी. एम. भोसले गुरूजी, सुरेश पाटील, हणमंत गुरव, राजाराम गुरव, मधू पाटील, नारायण राऊत, मनोहर निलजकर, अखीलसाब मन्नोळी, अर्जून देसाई, सुभाष पाटील, सुहास पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक अर्जून देसाई यांनी केले.
यावेळी बोलताना श्री साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले की, तालुक्यातील युवकांना कुस्तीची आवड निर्माण व्हावी, युवक व्यसनापासून दूर राहावे. आरोग्य हीच खरी संपत्ती याची ओळख व्हावी. या उद्देशाने माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधुन येत्या १० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता के. पी. नगर येथील आखाड्यात जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये खानापूर तालुक्यातील कुस्तीपटू बरोबर बेळगाव, हल्याळ, धारवाड येथील कुस्तीपटूंच्या कुस्त्या होणार असुन त्याच मोठ्या कुस्त्यांचेही आयोजन करण्यात येणार असुन २५ जानेवारीपर्यंत नावे नोंदवण्यासाठी मोबाईल नंबर ९४४८८७५३१८ यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती दिली.
यावेळी सुरेश पाटील, डी. एम. भोसले गुरूजी, हणमंत गुरव आदीनी विचार मांडले.
बैठकीला तालुक्यातील कुस्ती प्रेमी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta