खानापूर : वैयक्तिक हेवेदावे विसरून समितीला बळकटी देणे व आमिषाना बळी पडून राष्ट्रीय पक्षाकडे गेलेल्या तरुणाईला समितीच्या मुख्य प्रवाहात आणून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवून घेणे हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली, असे मत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत व्यक्त केले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज १७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता खानापूर शहरातील हुतात्मा स्मारक येथे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे आणि सरचिटणीस सीताराम बेडरे यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, पांडुरंग सावंत, बाळासाहेब शेलार, नारायण कापोलकर, पुंडलिक कारलगेकर, गोपाळराव पाटील, रणजीत पाटील, मारुती परमेकर, जगन्नाथ बिर्जे, विलास बेळगावकर, निरंजन सरदेसाई, जयराम देसाई, वाय. बी. पाटील, रामा खांबले, एम. एन. पावले यांच्यासह इतरांनी आपली मते मांडली. सर्वांनी समितीच्या झालेल्या एकीबद्दल समाधान व्यक्त केले आणि एकीची वज्रमूठ अभेद्य राखण्याचे आवाहन केले.
यावेळी सचिव सीताराम बेडरे, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, रामचंद्र पाटील, प्रभाकर बिर्जे, देवापन्ना गुरव, हनुमंत गुरव, शिवाजी पाटील, के. पी. पाटील, विलास बेळगावकर, अविनाश पाटील, अनिल पाटील, श्रीकांत दामले, रूकमाना झुंजवाडकर, विजयसिंह राजपूत, अमृत शेलार, सुनील पाटील, रमेश देसाई, सदानंद पाटील, मर्याप्पा पाटील, मारुती गुरव, प्रल्हाद घाडी, राजाराम देसाई, महांतेश पाटील, ए. बी. मुरगोड, दत्ता गावडे, पुंडलिक पाटील, बाबुराव पाटील, जयसिंगराव पाटील, रामचंद्र खांबले, भोपाल पाटील, गणेश पाटील, शामराव पाटील, ईश्वर बोभाटे, प्रल्हाद मादार, पुंडलिक पाटील, रणजीत पाटील, प्रमोद अळवाणी, देवाप्पा पाटील, रामचंद्र गावकर, जयंत पाटील करंबळ, महादेव अल्लोळकर, दत्तात्रय देसाई, एम. ए. खांबले, राजाभाऊ वाघदरे, विठ्ठल गुरव, शरद पाटील, परशराम चोपडे, पिराजी अळवाणी, राजेंद्र कुलम, प्रसादसिंह दळवी, विवेक गिरी, राजू लकेबैलकर, अनंत पाटील, बाबुराव पाटील, नारायण राऊत, प्रवीण सुळकर, कृष्णा कुंभार, मोहन गुरव, मुकुंद पाटील, मधु पाटील, संजय पाटील, नारायण पाटील, वैभव पडलकर, तुकाराम गोरल, मोहन कुलम, राजू कुंभार, प्रकाश देशपांडे, शंकर सुळकर, रवी हळदणकर, पुंडलिक चव्हाण, परशराम दौलतकर, दिगंबर देसाई, रमेश धबाले, डी. एम. भोसले, प्रवीण पाटील, शिवानंद सुळकर, मारुती पाटील, दीपक देसाई, महादेव घाडी, अर्जुन देसाई, वासुदेव चौगुले, लक्ष्मण पाटील, वसंत नवलकर, विठ्ठल ठाकरे, मनोहर पाटील, नारायण येळूरकर, अरुण सरदेसाई, फोंडू पाटील, भीमसेन करोळकर भास्कर पाटील, नारायण देसाई, रवींद्र शिंदे, मल्लाप्पा देसाई, हनुमंत देवकरी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta