खानापूर : मालमत्तेच्या वादातून भाऊबंदांनी एकाची हत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी खानापूर तालुक्यातील नंदगड परिसरात घडली.
यल्लाप्पा संताराम गुरव (वय 33 वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या बाळी कोडल गावच्या वेशीवरील एका घरात सदर खुनाचा प्रकार घडला आहे.
मालमत्तेच्या वादातून यल्लाप्पाच्या भाऊबंदांनी त्याचा खून केला असल्याचे समजते. नंदगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपास कार्य हाती घेतले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta