खानापूर : मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय खानापूर व FOCTAG व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 19/01/2023 रोजी म. म. महाविद्यालयात युथ सप्ताहाचा सांगता समारोह समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. श्रीमती जे. के. बागेवाडी व प्रमुख अतिथी म्हणून खानापूर मधील नामांकित वकील श्री. विलास पारीश्वाड, काॅलेजचे निवृत्त प्राचार्य एस. जी. सोन्नद होते. सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यांचा निकाल व बक्षीस वितरण उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला FOCTAG अध्यक्ष प्रा. पी. व्ही. कले॑कर, माजी
विद्यार्थी संघटना अध्यक्ष वसंत देसाई, प्राचार्य शरयु कदम, नॅक समन्वयक प्रा.विजयालक्ष्मी तिला॑पूर, भाऊ चव्हाण, महादेव कोळी, महांतेश कामशिनकोप कब्बुर, उदय देमट्टी, सुभाष देशपांडे, रवी काडगी, आय. टी. बडीगेर, जे. व्ही. बनोशी काॅलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आय. एम. गुरव. स्वागत प्रा. पी. व्ही. कले॑कर, प्रास्ताविक श्रीमती जे. व्ही. बनोशी व आभार प्रदर्शन वसंत देसाई यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta