खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम केवळ बीएसएनएलची केबल संबंधित खात्याने वेळीच न काढल्याने अर्धवट राहिले.
याबाबतची माहिती अशी, यंदा जत जांबोटी मार्गाचे रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम २० कोटी रूपये खर्चून करण्यात आले. मात्र खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी बीएसएनएल खात्याला केबल काढुन मार्ग मोकळा करण्याची सूचना वारंवार करून देखील बीएसएनएल खात्याने दखल घेतली नाही. त्यामुळे सीडीचे काम रेंगाळले. आता सार्वजनिक बांधकाम खात्याने सीडीचे काम पूर्ण व्हावे म्हणून कामाला सुरूवात केली. बीएसएनएल केबल काढुन सीडीच्या कामाला सुरुवात केल्याने खानापूर पासून जांबोटी पर्यंत विविध खात्याच्या कार्यालयात दुरध्वनी सेवेचा व्यत्यय आल्यास याला बीएसएनएल खाते जबाबदार राहणार आहे.
मात्र दोघांच्या भांडणात दुरध्वनी ग्राहक मात्र त्रासात पडणार आहेत.
तेव्हा बीएसएनएल खात्याने आपली केबल सुरक्षित ठेवून सीडीचे काम करण्यास सहकार्य करणे गरजेचे आहे. मात्र याकडे बीएसएनएल खात्याचे साफ दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे जांबोटीतील नेमदी केंद्र, शिवाजी नगरातील कृषी खाते, कळसाभांडुरा प्रकल्प खाते अशा विविध खात्याच्या कार्यालयात दुरध्वनी सेवेचा नाहक त्रास होणार आहे. याची जबाबदारी बीएसएनएल खात्याने घ्यावी लागणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta