खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक धनगरवाडे, गवळीवाडे, त्याचबरोबर तालुक्याच्या जंगल भागातील शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून जंगलात राहुन शेती करून उदरनिर्वाह करतात. मात्र वन खात्याकडून सतत जंगलातील जमिनींबाबत विरोध करत शेतकरी वर्गाला जगणे मुश्कील केले. या वनखात्याच्या विरोधात सतत लढा दिला जात आहे.
वन हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा देण्यासाठी अरण्य हक्क समितीचे हक्क, अधिकार, कार्य पध्दती समजुन घेण्यासाठी तसेच अरण्य हक्काचे वैयक्तिक व सामुदायिक दाव्याचे प्रस्ताव कसे बनावे, यासाठी एक दिवसाची कार्यशाळा बोलावून तुम्हाला याचे ज्ञान होणे गरजेचे आहे. तरच तुम्ही लढा देऊ शकाल, असे मत श्रमिक मुक्तीदलाचे कार्याध्यक्ष काॅ. संपत देसाई यांनी खानापूर येथील शिवस्मारक सभागृहात आयोजित कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीचे महादेव मरगाळे होते.
व्यासपीठावर प्रा. अविनाश भाले, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, अभिजीत सरदेसाई, रामचंद्र कांबळे, बाजी येडगे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थिताचे स्वागत महादेव मरगाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी प्रा. अविनाश भाले, बयाजी येडगे, रामचंद्र कांबळे तसेच महादेव मरगाळे आदीनी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले.
कार्य शाळेला खानापूर तालुक्यातील धनगरवाडा, गवळी वाडा, तसेच जंगल भागातील खेड्याचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta