खानापूर : माघी एकादशीनिमित्त वारकरी पायी दिंडी घेऊन पंढरपूरला जात आहेत. खानापूर तालुक्यातून कालमणी व गोल्याळी येथून वारकरी पायी दिंडीने पंढरपूर येथे जात आहेत.
पायी दिंडीत सामील झालेल्या वारकऱ्यांची भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी नुकताच भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या व दिंडीमध्ये सामील झालेल्या वारकऱ्यांचा डॉ. सरनोबत यांनी सत्कार केला व त्यांच्या अन्नदानाची सोय देखील केली आहे. डॉ. सोनाली सरनोबत यांनी राजकारणासोबत केलेल्या या समाजकार्याचे वारकरी संप्रदायाने कौतुक केले व त्यांना शुभाशीर्वाद दिले.
Belgaum Varta Belgaum Varta