खानापूर : बुधवारी सकाळी खानापूर तालुक्यातील गोदोळी येथे जंगली हत्तींच्या कळपाचे आगमन झाले असून त्यांनी शेतातील पिकाची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे.
सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना जंगली हत्तींच्या कळपाचे दर्शन घडले. लगेच शेतकऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांना आणि वन खात्याला हत्तीचा कळप आल्याची माहिती दिली. या कळपात चार हत्ती असून त्यामध्ये एक पिल्लू आहे. हत्तीच्या कळपाने ऊस आणि शेतातील अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. हत्तींना पिटाळण्यासाठी आरडाओरड करून कुत्र्यांना छु केले पण कळपातील मोठा हत्ती मागे फिरून त्या कुत्र्यावर धाऊन गेला. हत्तीचा कळप आल्यामुळे शेतकऱ्यांच्या त भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन खात्याने हत्तीच्या कळपाचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta