खानापूर : खानापूर शहरालगत असलेल्या शिवाजीनगर येथील व्ही. एन. पाटील निवृत्त जवान यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे स्फोट झाला व त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घटनेची माहिती भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाटील कुटुंबियांची चौकशी केली व त्यांना धीर दिला व 5000 रुपयांची मदत देखील डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली व पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta