खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील 25 कर्नाटका बटालियन संचलित एनसीसी विभागाची कॅडेट कुमारी संतोषी शिवाजी गुरव ही विद्यार्थिनी प्रजासत्ताक दिनी चालणाऱ्या पथसंचलनात सहभागी झाली आहे. कुमारी संतोष हिने याआधी राज्य पातळीवर परिश्रम घेत असताना बेळगाव, धारवाड, बल्लारी, मंगलोर, बेंगलोर इत्यादी ठिकाणी जवळजवळ सहा महिने चाललेल्या या राज्य पातळीवरील एनसीसी शिबिरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कर्नाटक राज्यातून निवडक विद्यार्थ्यांची दिल्ली येथे चालणाऱ्या पथसंंचालनात निवड होते. वास्तविक एनसीसी मध्ये येणारा प्रत्येक कॅडेट हा आरडीसी अर्थात राजपथावर पथसंचलनात भाग घ्यावयाचे उद्दिष्ट ठेवून येतो. मात्र सर्रास कॅडेटचे हे स्वप्न स्वप्नच राहते. खानापूर तालुक्यातील मराठा मंडळ महाविद्यालयाच्या या ध्येयवेढ्या कुमारी संतोषीने हा यशश्री खेचून आणला आहे. त्यामुळे ती खानापूर तालुक्यातील महिला विभागातून एनसीसीच्या माध्यमातून पथसंचलनात सहभागी होणारी पहिली विद्यार्थी ठरली आहे. तिच्या या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक होत असून तिला या यशापर्यंत पोहोचविण्यासाठी २५ कर्नाटका बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजीव सोहनी, लेफ्टनंट कर्नल नंदकुमार, महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. आय. एम. गुरव, महाविद्यालयाच्या विद्यमान प्राचार्या डॉ. जे. के. बागेवाडी २५ कर्नाटका बटालियनचा मिलिटरी स्टाफ इत्यादींचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta