खानापूर : खानापूर शहरात सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर संगोळी रायन्नाच्या बलिदान दिनानिमित्त गुरूवारी दि. २६ जानेवारी रोजी आयोजित भव्य बाईक रॅलीला युवकाचा भव्य प्रतिसाद लाभला.
गुरूवारी सकाळी रॅलीचे सुरूवात खानापूर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून करण्यात आली.
प्रारंभी खानापूर शहरातुन युवकांनी पारिश्वाड क्राॅस, जांबोटी क्राॅस, पणजी बेळगाव महामार्गावरून शिवस्मारक चौकातून बाईक रॅलीचा फेरफटका मारून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात युवकांनी उपस्थिती दर्शविली.
त्यानंतर बाईक रॅलीला सुरूवात होऊन नंदगड येथील क्रांतीवीर संगोळी रायन्नाच्या समाधी स्थळापर्यत जाऊन क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांना पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना हिंदुत्ववादी व भाजप युवा नेते पंडित ओगले म्हणाले की, २६ जानेवारी रोजी ब्रिटिशांनी क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांना नंदगड येथे फाशी दिली होती. त्यामुळे दर वर्षी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते बलिदान दिन म्हणून पाळतात. तसेच खानापूर ते नंदगड संगोळी रायन्ना समाधिस्थळापर्यंत बाईक रॅली काढुन क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांना अभिवादन करण्यात येते.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, किरण तुडवेकर, अनंत सावंत, शिवाजी गुरव, रोहित गुरव, मिथुन कुंभार, संजय मयेकर, संदीप ठोबरे, आदी शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाईक रॅलीत सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta