Friday , November 22 2024
Breaking News

डॉ. सोनाली सरनोबत खानापूर तालुक्यातील महिलांचे प्रेरणास्थान!

Spread the love

 

बेळगाव : विधानसभा निवडणुक अवघ्या कांही महिन्यावर येऊन ठेपली आहे. सर्व राष्ट्रीय पक्ष निवडणुकीसाठी रणनीती आखत आहेत. यात भाजप देखील आघाडीवर आहे. भाजप सरकार यंदाची निवडणूक “गुजरात पॅटर्न”वर लढविण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपाकडून जवळपास 60 ज्येष्ठ आमदारांना निरोपाचा नारळ देऊन नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती उपलब्ध झाली आहे.
“गुजरात पॅटर्न”च्या धर्तीवर “परफेक्ट फ्रेम” म्हणून सध्या खानापूर भाजप प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडे पाहिले जाते. डॉ. सोनाली सरनोबत या राजकारणासोबत समाजकारणाची व्यवस्थित सांगड घालताना दिसत आहेत.
डॉ. सोनाली सरनोबत या खानापूर मतदारसंघात प्रभारी म्हणून काम करत असताना त्यांनी संघटना वाढीकडे जातीने लक्ष दिले आहे. तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत त्या पोचल्या व तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. तालुक्यात भाजपचे समस्या निवारण केंद्र स्थापन करून त्यांनी सामान्य जनतेला आशेचा नवा किरण उपलब्ध करून दिला आहे. समस्या निवारण केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू मुलींना संगणक उपलब्ध करून दिले आहेत. त्याशिवाय तालुक्यातील बहुतांश जनतेचे आयुष्यमान कार्ड, आरोग्य कार्ड, पॅन कार्ड विनामूल्य करून दिले आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना वृद्धाप वेतन, विधवा वेतन मिळवून देण्यासाठी देखील डॉ. सरनोबत यांनी प्रयत्न केले आहेत. तालुक्यातील युवक- युवतींना शैक्षणिक मदत देखील त्या करत असतात.

खानापूर तालुक्यातील जवळपास 35 गावामध्ये रेशन पुरवठा केला जात होता. रेशन आणण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागत होती. त्या गावात रेशन पुरावठा सुरू करून देण्यात डॉ. सोनाली सरनोबत यांचा सिंहाचा वाट आहे. कोणतीही शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी डॉ. सरनोबत नेहमी प्रयत्नशील असतात. कोरोना काळात खानापूर तालुक्यातील शेवटचे टोक समजले जाणारे देगाव, आमगाव सारख्या दुर्गम भागात 5000 हुन अधिक किट वाटले आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील सरकारी शाळांमध्ये सॅनिटायझर, मास्क, ग्लोज, वाटप करण्यात आले आहेत.
पूर्व भागातील देवलत्ती भागात वीज पुरवठा सुरळीत होत नव्हता. पथदीप बंद पडले होते. यासंदर्भात देखील डॉ. सोनाली सरनोबत यांनी योग्य तो पाठपुरावा करून त्या गावात सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करून दिला आहे.

सध्या शेतकऱ्यांच्या जीवनात धुमाकूळ घातलेल्या लम्पि रोगासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून पशुखात्यातील तज्ज्ञांच्या मदतीने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून लम्पि रोगाने दगावलेल्या पशुपालकांना योग्य नुकसान भरपाई शासनाकडून मिळवून देण्यात डॉ. सोनाली सरनोबत अग्रेसर आहेत. त्याबरोबर लम्पि रोगावरील लस तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

डॉ. सरनोबत यांनी राजकारणापलिकडे धार्मिक कार्यात देखील आपला सहभाग दर्शविला आहे. वारकरी संप्रदायाबरोबर पारायण हरिनाम सप्ताह या माध्यमातून त्यांनी सांप्रदायिक समाजाशी आपली नाळ जोडली आहे. त्याचप्रमाणे हळदीकुंकूच्या माध्यमातून त्यांनी महिलांची वेगळी फळी तयार केली आहे. महिलांचे संघटन बांधून महिलांच्या विविध समस्या त्यांनी सोडविल्या आहेत.
राजकारणासोबत समाजकारणाची कास धरत डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याचा विचार करता डॉ. सोनाली सरनोबत यांच्या उमेदवारीचा विचार भाजपचे वरिष्ठ नक्कीच करतील यात शंका नाही.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती

Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *