Monday , September 21 2026
Breaking News

खानापूरात उद्या जंगी कुस्ती मैदान

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : श्री साई कृष्ण प्रतिष्ठान खानापूर यांच्या वतीने उद्या शुक्रवारी दि. १२ रोजी बरगांव जवळील श्री साई मंगल कार्यालयाच्या आवारात दुपारी तीन वाजता जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रथम क्रमांकाची कुस्ती डब्बल कर्नाटक केसरी पै कार्तिक काटे विरूद्ध पै कमळजीत पंजाब, व्दितीय क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी पै संगमेश बिराजदार विरूध्द पै राकेश कुमार पंजाब, तृतीय क्रमांकाची कुस्ती पै कालीचरण बिराजदार विरूध्द पै किर्ती कुमार कार्ये याच्यात होणार आहे.
याचबरोबर एकूण ४१ कुस्त्या होणार आहेत.
यावेळी आखाड्याच्या अध्यक्ष स्थानी के पी पाटील उपस्थित राहणार आहेत. तर आखाड्याचे उदघाटन व पुजन गुरुवर्य परशुभाऊ नंदीहळ्ळी व गोपाळ महाराज यांच्या हस्ते होणार आहे. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटो पुजन होणार आहे. तरी कुस्ती शौकीनांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *