Thursday , March 5 2026
Breaking News

खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी चेअरमनपदी विनोद पाटील

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बुधवारी दि. 7 रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या सर्व साधारण बैठकीत नुतन स्थायी कमिटीच्या चेअरमनपदी नविन नगरसेवकांना संधी देण्याबाबत चर्चा करण्यात आला. या सर्वानुमते विनोद पाटील यांच्या नावाची नगरसेवकातून चर्चा झाली.
यावेळी स्थायी कमिटीच्या चेअरमन पदी विनोद पाटील यांच्या नावाची बिनविरोध निवड करण्यात आली. नुतन स्थायी कमिटीचे चेअरमन विनोद पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन नगराध्यक्ष नारायण मयेकर व प्रकाश बैलूरकर तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक तोहीद चांदखणावर, लक्ष्मण मादार, आप्पया कोडोळी, विनायक कलाल, नारायण ओगले, हणमंत पुजार, विनोद पाटील, मजहर खानापूरी, महमद रफिक वारेमणी, मिनाक्षी बैलूरकर, लता पाटील, गावडे, जया भुत की, तोपिनकट्टी, फातिमा बेपारी, सहारा सनदी आदीनी सत्कार केला.
यावेळी नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *