Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर समितीकडे गोपाळ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

 

खानापूर : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने इच्छुकांचे अर्ज सादर करण्यासाठी आवाहन केले आहे. यानुसार आज खानापूर विधानसभा मतदारसंघातून खानापूर म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील यांनी उमेदवारीसाठी अर्ज समितीकडे सादर केला आहे.

अर्जदारांकडून ५१ हजार रुपये देणगीदाखल घेऊन म. ए. समिती अर्ज स्वीकारत आहे. गोपाळ पाटील यांनी खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे व
सचिव विलास बेडरे यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला आहे.
यावेळी प्रकाश चव्हाण, विलास बेळगावकर, पांडू सावंत, निरंजन सरदेसाई, फकिरा सावंत, शंकर पाटील, रमेश धबाले, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *