Sunday , September 20 2026
Breaking News

डीएफओ व्यंकटेश यांच्यावर लोकायुक्त छापा

Spread the love

 

बेंगळुरू : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेंगलोर, रामनगर आणि कोलारमध्ये एकाच वेळी छापे मारले. बेकायदेशीरपणे मालमत्ता संपादन केल्याप्रकरणी कोलार डीएफओ व्यंकटेश यांना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी कोलार क्लॉक टॉवर जवळील विजयनगर, रामनगर, बेंगलोर येथील कोलार सोशल फॉरेस्ट ऑफिसर डीएफओ व्यंकटेश यांच्या फार्म हाऊसवर छापा टाकला आणि कागदपत्रांची तपासणी केली. अचानकपणे टाकलेल्या छाप्यामुळे व्यंकटेश यांना कोणतीच हालचाल करता आली नाही. व्यंकटेश यांच्या मालमत्तेची व त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची कसून चौकशी करण्यात आली. लोकायुक्त ए एस पी उमेश यांच्या नेतृत्वाखाली हा छापा घालण्यात आला. 4 डीवायएसपी, 5 निरीक्षकांसह 25 हून अधिक कर्मचारी या चौकशीसाठी होते. एकूण आठ ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *