खानापूर (प्रतिनिधी) : कुसमळी (ता. खानापूर) तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष, जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलास बेळगावकर यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शुक्रवारी दि. १० रोजी खानापूर सरकारी दवाखान्यातील रुग्णाना फळे वाटून करण्यात आला
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, प्रकाश चव्हाण, मारूती परमेकर, ज्येष्ठ नेते शंकर पाटील, फकिरा सावंत, निरंजन सरदेसाई, सुनिल पाटील, पुंडलिक पाटील, म्हत्रू धबाले, आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील तसेच जांबोटी सोसायटीचे सभासद, मॅनेजर, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
प्रारंभी माजी आमदार दिगंबर पाटील व उपस्थित मान्यवरांनी सहकारी दवाखान्यात विलास बेळगावकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्या देऊ केल्या.
यावेळी सहकारी दवाखान्यातील जवळपास १०० रुग्णाना फळे वाटून त्यांची विचारपूस केली.
Belgaum Varta Belgaum Varta